छत्रपती शिवाजी महाराज यांच्या (तीन एप्रिल) स्मृतिदिनानिमित्त...
शिवरायांचे रूप आठवा, स्मरण तयांचे ठेवा
स्वराज्यरक्षण करण्यासाठी, भाव समर्पित हवा
सह्याद्रीच्या कड्या-कपारी, शिवबाने घेतली भरारी
रयतेच्या कल्याणासाठी, दिल्लीवरही केली स्वारी
पवित्र भूमी, पावन माती, प्रिय होता भगवा
स्वराज्यरक्षण करण्यासाठी, भाव समर्पित हवा
कितीक शत्रू आले - गेले, बहू मावळे लढले
लढता लढता शूरवीर ते, धारातीर्थी पडले
कथा ऐकुनी त्यांच्या साऱ्या, जोश जागवा नवा
स्वराज्य रक्षण करण्यासाठी, भाव समर्पित हवा
नको उगा सोहळे तयांचे, नको निनाद नावांचे
ध्यानी असू द्या- भान ठेवा, त्यांच्या संस्कारांचे
शक्ती- बुद्धीच्या जोरावरती, देश नव्याने घडवा
स्वराज्य रक्षण करण्यासाठी, भाव समर्पित हवा
मायभवानी वाट पाहते, भक्तांना ती मार्ग दावते
शपथ घेऊ या-सेवा करू या, अंगी बळही तीच देते
देश आपला बळकट होवो, तोच असू दे नारा
स्वराज्यरक्षण करण्यासाठी, भाव समर्पित हवा
- कौमुदी परांजपे
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment