हे हनुमंता... - अमृत महाराष्ट्र

हे हनुमंता...

हनुमान जयंतीनिमित्त घातलेले साकडे...

हे हनुमंता... मुख्य फोटो
मुख्य फोटो

शक्ती, बुद्धी दे 

ज्ञानतेज दे 

मारुतीराया अंजनीसुता 

रामभक्त तू रामदूत तू 

दुष्टांचा तू अंतकाळ 

महावीर तू बलशाली तू 

भक्तांचा रे तारणहार 

सूक्ष्मरूप तू, महाकाय तू 

तू रुद्राचा रे अवतार

पवनपुत्र तू दीनानाथ तू 

ज्ञानाचा रे तू प्रकाश

प्रतीक आहे तू भक्तीचे 

धैर्याचे अन् निष्ठेचे

तुझ्याविना रे अपूर्ण आहे

सार रामकथेचे

हेच मागणे तुझिया ठायी

नाम स्मरू दे तुझे

देह झिजू दे माझा करण्या

रक्षण भारतभूचे

- कौमुदी परांजपे

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 02-04-2026 News publication date | Time: 02:48 PM News publication time | Views: 209 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement