युवकांना सर्वांगीण विकासाचे 'अमृत' देणारी संस्था - अमृत महाराष्ट्र

युवकांना सर्वांगीण विकासाचे 'अमृत' देणारी संस्था

व्यक्तिमत्त्व विकासासाठी मूल्यशिक्षणापासून उद्योजकताविकासापर्यंत वैविध्यपूर्ण विषयांची प्रशिक्षणे

युवकांना सर्वांगीण विकासाचे 'अमृत' देणारी संस्था मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. त्यासाठी ही संस्था विविध समाजघटकांना डोळ्यांसमोर ठेवून विविध प्रकारचे उपक्रम राबवत आहे. शिक्षणासोबतच कौशल्य, मूल्ये आणि उद्योजकता यांचे धडे देऊन अमृत संस्था युवकांना सक्षम बनवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. संस्थेच्या अमृत वर्ग या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पारंपरिक मूल्ये, शिस्त, नैतिकता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित केली जात आहे. व्यक्तिमत्त्व विकास, संवादकौशल्य, नेतृत्वगुण आणि सामाजिक जबाबदारी यांवर भर देऊन विद्यार्थ्यांना भविष्यासाठी घडवले जात आहे. अमृत वर्गांमुळे युवकांमध्ये आत्मविश्वास वाढून ते योग्य निर्णय घेण्यास सक्षम होत आहेत.

याचबरोबर, अमृत पर्यटन या उपक्रमाद्वारे स्थानिक पर्यटन क्षेत्राला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पर्यटनाच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध करून देऊन युवकांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवला जात आहे. स्थानिक स्तरावर पर्यटनविषयक माहिती, मार्गदर्शन आणि व्यवसायाच्या संधी निर्माण करणारा हा उपक्रम प्रभावी ठरत आहे.

अमृतपेठ थेट बाजारपेठ हा उपक्रम शेतकरी, कारागीर आणि लघुउद्योजकांसाठी मोठा आधार बनला आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन माध्यमातून ग्राहकांना थेट उत्पादकांशी जोडल्यामुळे मध्यस्थांची गरज कमी होऊ शकणार आहे. यामुळे उत्पादकांना योग्य मोबदला मिळत असून ग्राहकांनाही दर्जेदार स्थानिक उत्पादने सहज उपलब्ध होत आहेत. अमृत संस्थेच्या विविध उपक्रमांमुळे राज्यातील अनेक युवक स्वावलंबनाकडे वाटचाल करत आहेत. प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन यांमुळे नोकरी शोधणारे युवक आता नोकरी निर्माण करणारे बनण्याचा प्रयत्न करत आहेत.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: अविनाश कुलकर्णी News publisher name | Date: 02-04-2026 News publication date | Time: 09:04 AM News publication time | Views: 482 Number of times this news has been viewed | District: satara Related district of the news
Publisher: अविनाश कुलकर्णी News publisher name | Date: 02-04-2026 News publication date | Time: 09:04 AM News publication time | Views: 482 Number of times this news has been viewed | District: satara Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement