उदयोन्मुख खेळाडूची अभिमानास्पद कामगिरी
अमरावती : शहरातील उदयोन्मुख खेळाडू स्वरांगी सागर जामकर हिने चौथ्या राष्ट्रीय खुल्या योगासन स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून रौप्यपदक प्राप्त केले. क्रीडा क्षेत्रातील तिच्या या उज्ज्वल यशामुळे अमरावती शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. स्वरांगी जामकर हिचे कुटुंब अमृत संस्थेशी जोडले गेलेले असून, अमृत संस्थेतर्फे राबवले जाणारे विविध उपक्रम आणि कार्यक्रमांत हे कुटुंब सक्रिय सहभाग घेते.
स्वरांगीने कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि जिद्दीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. स्पर्धेमध्ये देशभरातून सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून स्वरांगीने उपविजेतेपद पटकावले. तिच्या या यशाबद्दल अमृत संस्थेतर्फे तिचे अभिनंदन करण्यात आले आहे. भविष्यात ती आणखी मोठ्या स्पर्धांमध्ये यश मिळवेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment