पुसेगावच्या प्राची कुलकर्णींचे MPSC परीक्षेत सुयश, संपूर्ण राज्यात २८३ वा क्रमांक पटकावून आपल्या गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला
पुसेगाव: प्रबळ इच्छाशक्ती आणि कष्टाच्या जोरावर पुसेगाव (जि. सातारा) येथील प्राची संजय कुलकर्णी यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांनी संपूर्ण राज्यात २८३ वा क्रमांक पटकावून आपल्या गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. 'अमृत' योजनेचा आधार मोलाचा प्राची यांनी त्यांच्या या यशात 'अमृत' AMRUT - (Academy of Maharashtra Research, Upliftment & Training) ) संस्थेच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या 'अमृत' संस्थेच्या 'MPSC स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन अर्थसहाय्य' योजनेचा त्यांनी लाभ घेतला. या आर्थिक पाठबळामुळे त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे सोपे झाले. यशाचे गमक ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत प्राची यांनी हे यश मिळवले आहे. त्यांच्या या यशाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, "सातत्यपूर्ण अभ्यास आणि योग्य मार्गदर्शनामुळेच मी हे ध्येय गाठू शकले. अमृत संस्थेच्या मदतीने आपले ध्येय पूर्तीचे स्वप्नबाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठे प्रोत्साहन मिळत आहे." कौतुकाचा वर्षाव प्राची यांच्या या यशाबद्दल पुसेगाव परिसरातून आणि मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. महसूल विभागात मोठ्या पदावर कार्यरत होऊन समाजाची सेवा करण्याचे त्यांचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment