अमृत कौशल्य उद्यम विकास प्रशिक्षण उपक्रमांतर्गत आयोजन
अहिल्यानगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध प्रकारचे कौशल्यविकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. त्यातील अमृत कौशल्य उद्यम विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये अमृत आरीवर्क प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आला आहे. शिवणकामाच्या स्वयंरोजगारासाठी आवश्यक कौशल्ये प्राप्त व्हावीत, असा त्यामागचा उद्देश आहे. त्या वर्गाचे उद्घाटन अमृत संस्थेचे अहिल्यानगर जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांच्या हस्ते १० फेब्रुवारीला करण्यात आले. या वेळी निवृत्त आयएएस अधिकारी आणि रेरा सोल्युशन्सचे संचालक निर्मल देशमुखही उपस्थित होते.
सुमारे १५ दिवसांच्या या प्रशिक्षणात १४ महिलांनी सहभाग घेतला आहे. नीरजा विकासवर्धिनीच्या संचालिका सौ. अपर्णा देशमुख आणि त्यांच्या सहकारी यामध्ये प्रशिक्षण देणार आहेत. लक्ष्यित गटातील महिलांना चांगले प्रशिक्षण देऊन त्यांच्यातून यशस्वी उद्योजिका घडाव्यात असा अमृत संस्थेचा उद्देश असून, त्या दृष्टीने दर्जेदार प्रशिक्षण दिले जाईल, अशी ग्वाही अपर्णा देशमुख यांनी दिली. तसेच, अमृत संस्थेसोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधानही व्यक्त केले.
मोबाइल : 9112228769.
कार्यालय पत्ता : अमृत, वरुण अपार्टमेंट,
आकाशवाणी केंद्रासमोर, सावेडी,
अहिल्यानगर - 414003
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment