इंग्रजी टायपिंग परीक्षा उत्तीर्ण; प्रथमेश पाचखेडेला 'अमृत'कडून अर्थसाह्य

अमरावतीतील विद्यार्थी

इंग्रजी टायपिंग परीक्षा उत्तीर्ण; प्रथमेश पाचखेडेला 'अमृत'कडून अर्थसाह्य मुख्य फोटो
मुख्य फोटो

अमरावती : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवल्या जातात. त्यात शासकीय टायपिंग परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर फी परतावा देण्याच्या योजनेचाही समावेश आहे. या योजनेअंतर्गत अमरावती येथील प्रथमेश पाचखेडे याने इंग्रजी टायपिंग (४० शब्दगती) परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली. त्यानंतर त्याला अमृत संस्थेकडून त्या कोर्सचा शुल्कपरतावा देण्यात आला आहे. अमृत संस्थेच्या या योजनेमुळे विद्यार्थ्यांना शासकीय सेवेसाठी आवश्यक पात्रता मिळण्यास मदत होत असून, रोजगाराच्या संधी वाढत आहेत.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 10-02-2026 News publication date | Time: 03:31 PM News publication time | Views: 161 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 10-02-2026 News publication date | Time: 03:31 PM News publication time | Views: 161 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words