नवउद्योजकांना मिळणार ऊर्जा आणि प्रेरणा
जालना : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत संस्थेच्या वतीने जालन्यात आयोजित करण्यात आलेल्या अमृत उद्योग कौशल्यवर्धन (ईडीपी) प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. अमृत संस्थेचे विभागीय व्यवस्थापक ओमकार शेटे यांच्या हस्ते या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
उद्घाटनप्रसंगी अमृत संस्थेचे जालना जिल्हा व्यवस्थापक नितीन खेकाळे यांनी मार्गदर्शन केले. हे प्रशिक्षण नवउद्योजकांसाठी प्रेरणा व ऊर्जास्रोत बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. युवकांनी आपल्या कौशल्यांच्या जोरावर स्वतःचा उद्योग उभारून रोजगारनिर्मितीकडे वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.
प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी 'उद्योजक म्हणजे काय आणि उद्योजकाची ओळख' या विषयावर शरद जोशी यांचे प्रभावी मार्गदर्शन सत्र झाले. उद्योजकतेची मूलभूत संकल्पना, यशस्वी उद्योजकाचे गुणधर्म, संधी ओळखण्याची कला आणि उद्योग सुरू करण्याकरिता आवश्यक मानसिकता यावर या सत्रात सविस्तर प्रकाश टाकण्यात आला. प्रशिक्षणार्थ्यांचा या सत्राला चांगला प्रतिसाद लाभला.
या वेळी जिल्हा उपव्यवस्थापक चिंतेश जोशी, अमृतमित्र सत्यम अग्रवाल यांच्यासह अमृत संस्थेचे पदाधिकारी, मार्गदर्शक व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. अमृत उद्योग कौशल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रमातून जालना जिल्ह्यात नवउद्योजक घडवण्याकरिता आणि आर्थिक स्वावलंबनाला बळ मिळणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
जालना शहरासह जिल्ह्यातील आणि बाहेरगावच्या इच्छुक प्रशिक्षणार्थ्यांनी यात सहभाग घेतला आहे. उद्योजकता विकास, कौशल्यवृद्धी आणि स्वावलंबनाच्या दिशेने जाण्याकरिता मार्गदर्शन करणारा हा उपक्रम युवक-युवतींसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
नितीन खेकाळे - 7391065474,9130283058
जालना जिल्हा व्यवस्थापक, अमृत
चिंतेश जोशी - 9421944752
जालना जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment