संत नरहरी सोनार यांचा अभंग
काय तुझी थोरी वर्णं मी पामर ।
होसी दयाकर कृपानिधी ।।१।।
तुजसरशी दया नाहीं आणिकासी ।
असे हृषीकेशी नवल एक ।।२।।
जन हो जोडी करा नाम कंठीं धरा ।
जेणे चुके फेरा गर्भवासी ।।३।।
नरदेहीं साधन समता भावभक्ति ।
निजध्यास चित्तीं संतसेवा ।।४।।
गुरुपदीं निश्चळ परब्रह्म पाहे ।
नरहरी राहे एकचित्तें ।।५।।
- संत नरहरी सोनार (संकलक : प्रसाद वैद्य, रत्नागिरी)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment