मेंढे बूट हाउस : गोंदियाच्या ग्रामीण भागातील तरुणाने धाडसीपणे सत्यात उतरवलेले स्वप्न

आमगाव तालुक्यातील तरुण उद्योजक कुणाल मेंढे यांची प्रेरक यशोगाथा

मेंढे बूट हाउस : गोंदियाच्या ग्रामीण भागातील तरुणाने धाडसीपणे सत्यात उतरवलेले स्वप्न मुख्य फोटो
मेंढे बूट हाउस : गोंदियाच्या ग्रामीण भागातील तरुणाने धाडसीपणे सत्यात उतरवलेले स्वप्न अतिरिक्त फोटो

गोंदिया : उद्योग-व्यवसाय ही अशी गोष्ट आहे, की जी व्यक्ती यामध्ये सर्वस्व झोकून देऊन काम करते, ती नक्कीच यशस्वी होते. व्यवसाय, मग तो कोणताही असो, प्रामाणिकपणे केला, तर त्यातून नक्कीच प्रगती होते. अर्थातच, त्यासाठी धाडस आणि जिद्द मात्र लागते. याचे एक प्रेरक उदाहरण गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील तरुण उद्योजक कुणाल मेंढे यांच्या रूपाने पाहायला मिळते. 

कुणाल मेंढे यांचे वय फार नाही; मात्र त्याचा अडसर त्यांच्या निर्णयक्षमतेत आला नाही. त्यांनी तब्बल ५० लाख रुपये गुंतवणूक करून मेंढे बूट हाउस हा व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्या भव्य दुकानात आधुनिक डिझाईनचे बूट, चप्पल उपलब्ध आहेत. दर्जेदार, गुणवत्तापूर्ण पादत्राणे आणि परवडणारी किंमत यांमुळे गोंदिया ते आमगाव परिसरातील ग्राहक खरेदीसाठी मुद्दामहून येथे येतात. डिजिटल मार्केटिंगचा प्रभावी वापर करून ते व्यवसायाला नवी दिशा देत आहेत. लवकरच मेंढे बूट हाउस अमृतपेठ या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध होणार आहे. कुणाल मेंढे यांचा हा प्रवास नव्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

अल्पावधीत प्रसिद्धी मिळवलेले, वयाने तरुण आणि नव्या विचारांचे उद्योजक कुणाल मेंढे आज नव्या युगाचा आदर्श ठरत आहेत. डिजिटल मार्केटिंगचा प्रभावी वापर करून त्यांनी आपल्या व्यवसायाचा तालुका पातळीवरही उत्तम प्रचार केला आहे. म्हणूनच मेंढे बूट हाउस या नावाने शोध घेत ग्राहक त्यांच्याकडे येतात, हीच त्यांच्या गुणवत्तेची आणि विश्वासाची पावती आहे. ग्राहकांच्या पसंतीनुसार आधुनिक डिझाइन्सची पादत्राणे त्यांच्याकडे उपलब्ध असतात.

अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवते. त्या संस्थेच्या अमृतपेठ या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही मेंढे यांच्याकडील दर्जेदार पादत्राणे लवकरच उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना घरबसल्या खरेदीची सुविधा मिळणार आहे. डिजिटल युगात ग्रामीण भागातून यशस्वीपणे व्यवसाय उभारण्याचा त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास निश्चितच इतर तरुणांसाठी दिशादर्शक ठरेल.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Kartik Tiwari News publisher name | Date: 05-02-2026 News publication date | Time: 02:30 PM News publication time | Views: 1,318 Number of times this news has been viewed | District: gondia Related district of the news
Publisher: Kartik Tiwari News publisher name | Date: 05-02-2026 News publication date | Time: 02:30 PM News publication time | Views: 1,318 Number of times this news has been viewed | District: gondia Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words