कोल्हापुरातील Eatsy Foodची उत्पादने अमृतपेठ ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध
कोल्हापूर : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने विकसित केलेला अमृतपेठ हा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म स्थानिक लघुउद्योग आणि व्यवसायांना चांगली ऑनलाइन बाजारपेठ उपलब्ध करून देत आहे. कोल्हापूरमधील उद्योजक ओंकार परुळेकर यांनाही त्या प्लॅटफॉर्मचा उपयोग झाला आहे. Eatsy Food या नावाचा त्यांचा खाद्यपदार्थ उत्पादन व्यवसाय असून, त्याची नोंदणी अमृतपेठवर करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांची उत्पादने सर्वत्र पोहोचण्यास मदत होणार आहे. त्यामुळे अस्सल कोल्हापुरी मिसळीची चव कोल्हापूरसह अन्य ठिकाणच्या ग्राहकांनाही घरबसल्या चाखता येणार आहे.
घरगुती चव, शुद्धता आणि गुणवत्तेचा विश्वास ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ओंकार परुळेकर यांनी हा व्यवसाय सुरू केला. अस्सल कोल्हापुरी मिसळ, सोलकढी पावडर, बीटरूट पावडर अशी ‘Eatsy Food’ची उत्पादने लोकप्रिय आहेत. सर्व खाद्यपदार्थ स्वच्छ, सुरक्षित आणि संबंधित नियमांचे पालन करून तयार केले जात असून, ग्राहकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. दर्जा उत्कृष्ट राखण्यासाठी कच्चा माल काळजीपूर्वक निवडला जातो, असे ओंकार परुळेकर यांनी सांगितले. (वरील फोटोत डावीकडे ओंकार परुळेकर)
अमृतपेठ ई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममुळे लघुउद्योजकांना आपल्या उत्पादनांची ऑनलाइन विक्री करण्याची मोठी संधी मिळत आहे. या प्लॅटफॉर्मवर नोंदणी झाल्यामुळे ‘Eatsy Food’ च्या उत्पादनांना अधिक व्यापक बाजारपेठ उपलब्ध होणार असून, राज्यभरातील ग्राहक थेट ऑनलाइन ऑर्डर देऊ शकणार आहेत. त्यामुळे स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन मिळून आर्थिक विकासाला हातभार लागणार आहे.
अमृतपेठ ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म हा नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी उपक्रम ठरत आहे.
amrutpeth.com/shop/eatsy-foods-1149
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment