लोकमान्य टिळकांचा प्रेरक विचार
इथे अंधार म्हणजे अपयश, भीती आणि निराशा. तो कायमचा नसतो, हे समजून घेणेच खरी आशा आहे. ही वेळसुद्धा जाईल हे लक्षात ठेवले, की आपले दु:ख हलके होते. प्रत्येक अडचण आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठीच येते. उजेड म्हणजे यश, समाधान आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. जसे अंधारातून उजेडात आले, की प्रकाशाचे महत्त्व लक्षात येते, तसेच अपयशानंतर जेव्हा पुढे यश मिळते, तेव्हा त्या यशाची खरी किंमत समजते. जे यश विनासायास मिळते ते खरे यश नसते. ते मिळवण्यासाठी जे थांबत नाहीत, तेच उजेडापर्यंत पोहोचतात. संघर्षाशिवाय यशाची चव कधीच गोड वाटत नाही. धैर्य ठेवले तर मार्ग आपोआप स्पष्ट होतो. धैर्य ठेवण्यासाठी मनात सकारात्मक विचार ठेवणे फार गरजेचे आहे. आशा हीच माणसाची खरी ताकद आहे. स्वतःवर विश्वास ठेवल्यास अंधार कमी होतो. लोकमान्य टिळकांच्या या विचारामागे त्यांचे खडतर आयुष्य, प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी केलेला संघर्ष, विपरीत परिस्थितीत कार्य करणे आणि ते पूर्णत्वास नेणे हा अनुभव आहे. त्यामुळे त्यांचा हा विचार खूप मौल्यवान आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment