बालगृह प्रकल्पाला गरजेच्या वस्तू आणि मेडिकल किट दान
अहिल्यानगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आपल्या लक्ष्यित गटाच्या सक्षमीकरणासाठी तर कार्यरत आहेच; पण त्या व्यतिरिक्त संस्थेतर्फे सेवाकार्यही केले जाते. अहिल्यानगरमधील सावेडी येथील तपोवन रोडवरील अनाथालयासाठी अमृत संस्थेतर्फे मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. रुद्रपूजा फाउंडेशन संचलित अनाथ व निराधार मुलांचे बालगृह या प्रकल्पातील मुलांसाठी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि मेडिकल किट दिले.
हा लोकसहभागातून चालवला जाणारा प्रकल्प आहे. प्रकल्पाचे संचालक युवराज गुंड यांनी अनेक अडचणींतून निराधार आणि अनाथ मुलांकरिता कार्याची सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी एकूण ५८ मुला-मुलींना आधार दिला आहे. हे कार्य पाहून त्यांच्या या कार्याला अमृत संस्थेमार्फत थोडा हातभार लावण्याकरिता या वस्तू त्यांना देण्यात आल्या. तेथील विद्यार्थ्यांनी भोपे यांचे आपुलकीने स्वागत केले. या वेळी मनोज कोकाटे, अमृतमित्र सुजल झुंजारे आदी उपस्थित होते. अमृत संस्थेतर्फे या प्रकल्पाला शुभेच्छा देण्यात आल्या आणि अमृत संस्थेचे सदैव सहकार्य असेल, अशी भावना भोपे यांनी व्यक्त केली.
अधिक माहितीसाठी
पत्ता : अमृत कार्यालय, वरुण अपार्टमेंट,
आकाशवाणी केंद्रासमोर, सावेडी,
अहिल्यानगर - 414003
संपर्क क्रमांक : 9112228769
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment