श्री क्षेत्र मंजरथ येथे १८-१९ जानेवारीला सहस्र ब्राह्मणभोजन सोहळा

उमरखेडच्या श्री चिन्मयमूर्ती संस्थेतर्फे बीडच्या माजलगाव तालुक्यात प्रथमच आयोजन

श्री क्षेत्र मंजरथ येथे १८-१९ जानेवारीला सहस्र ब्राह्मणभोजन सोहळा मुख्य फोटो
मुख्य फोटो

माजलगाव (जि. बीड) : माजलगाव तालुक्यातील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र मंजरथ येथे उमरखेडच्या श्री चिन्मयमूर्ती संस्थेच्या वतीने तालुक्यात प्रथमच सहस्र ब्राह्मणभोजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम १८ आणि १९ जानेवारी २०२६ रोजी भक्तिमय वातावरणात होणार आहे. 

या वेळी वैदिक परंपरेनुसार विविध धार्मिक विधी, पूजन, मंत्रोच्चार, शोभायात्रा व दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी, १८ जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता श्री प. पू. माधवानंद महाराज यांचे श्री क्षेत्र मंजरथ येथे आगमन व मिरवणूक होणार आहे. सायंकाळी सात वाजता दत्त मंदिर येथे श्री विश्वेश्वर लिंगदर्शन सोहळा होणार आहे. सोमवारी, १९ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता गणपती मंदिर ते सोमेश्वर मंदिर या मार्गावर श्री प. पू. माधवानंद महाराज यांची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता सोमेश्वर मंदिर येथे श्री विश्वेश्वर लिंगदर्शन सोहळा होणार असून, दुपारी एक वाजता सहस्र ब्राह्मणभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी दोन ते सायंकाळी पाच या कालावधीत महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. सायंकाळी सात वाजता पुन्हा श्री विश्वेश्वर लिंगदर्शन सोहळा होणार आहे.

श्री क्षेत्र मंजरथ ही भूमी प्राचीन काळापासून श्रद्धा व भक्तीचे केंद्र राहिली असून, येथे होणारा हा भव्य सोहळा परिसराला नवचैतन्य देणारा ठरणार आहे. या पवित्र सोहळ्याच्या निमित्ताने तालुक्यासह जिल्ह्यातील भाविक, मान्यवर, धर्मप्रेमी नागरिक व ब्राह्मण बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे. समाजात धार्मिक संस्कार दृढ व्हावेत, परंपरेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा, तसेच सामाजिक एकोपा व आध्यात्मिक जाणीव वृद्धिंगत व्हावी, या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे श्री चिन्मयमूर्ती संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

सर्व भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. श्री क्षेत्र मंजरथच्या पावन भूमीत होणारा हा सहस्र ब्राह्मणभोजन सोहळा धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक दृष्टिकोनातून एक ऐतिहासिक पर्व ठरणार असून, माजलगाव तालुक्याच्या धार्मिक इतिहासात हा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणार आहे.

Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 15-01-2026 News publication date | Time: 04:44 PM News publication time | Views: 533 Number of times this news has been viewed | District: beed Related district of the news
Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 15-01-2026 News publication date | Time: 04:44 PM News publication time | Views: 533 Number of times this news has been viewed | District: beed Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words