पी. टी. उषा

मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर अनेक विक्रम प्रस्थापित करणारी 'पय्योली एक्स्प्रेस'

पी. टी. उषा मुख्य फोटो
मुख्य फोटो

पी. टी. उषा म्हणजे भारतीय क्रीडा इतिहासातील सुवर्णपान. पय्योली एक्स्प्रेस किंवा गोल्डन गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पी. टी. उषा यांनी जागतिक पातळीवर भारतीय अ‍ॅथलेटिक्सला एक वेगळी उंची दिली. त्यांची मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी अनेक विक्रम प्रस्थापित केले. 

पिलावुळ्लाकंडी थेक्केपरांबिल उषा (पी. टी. उषा) यांचा जन्म २७ जून १९६४ रोजी केरळच्या कोळिकोड जिल्ह्यातील पय्योली येथे झाला. गरिबीमुळे त्यांचे बालपण संघर्षमय होते. परंतु त्यांना खेळांची आवड लहानपणापासूनच होती. पुढे त्यांना योग्य क्रीडा प्रशिक्षण मिळाले आणि त्यांच्या वेगवान धावण्याच्या क्षमतेला योग्य दिशा मिळाली. 

अनेक स्थनिक आणि राज्यस्तरीय क्रीडा सामन्यांमध्ये यश प्राप्त केल्यानंतर १९७९मध्ये वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी पी. टी. उषा यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करून आपली ओळख निर्माण केली. १९८२च्या आशियाई खेळांमध्ये त्यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाची चुणूक दाखवली. १९८४च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिक स्पर्धेमध्ये ४०० मीटर हर्डल्स प्रकारात त्या चौथ्या क्रमांकावर राहिल्या. अवघ्या क्षणामुळे त्यांचे आणि भारताचे कांस्यपदक हुकले. १९८६च्या सियोल आशियाई खेळांमध्ये त्यांनी चार सुवर्णपदके आणि एक रौप्यपदक जिंकले. १९८५मध्ये जाकार्ता येथे झालेल्या एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये त्यांनी पाच सुवर्णपदके जिंकली. 

आशियाई स्तरावर १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर, ४०० मीटर हर्डल्स आणि ४x४०० मीटर रिले यामध्ये मोठे यश मिळवणाऱ्या पी. टी. उषा यशस्वी धावपटू तर आहेतच; पण त्या भारतीय स्त्रियांसाठी एक प्रेरणादायी आदर्श आहेत. अ‍ॅथलेटिक्स क्षेत्रात भारताचे नाव मोठे करणाऱ्या उषा यांनी नंतर आपल्या अनुभवाच्या जोरावर युवा खेळाडूंना घडवण्याचे कार्य सुरू केले. 

१९९१ मध्ये त्यांनी उषा स्कूल ऑफ अ‍ॅथलेटिक्सची स्थापना केली. तिथे अनेक होतकरू खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक भारतीय अ‍ॅथलीट्स आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत. 

पी. टी. उषा यांच्या क्रीडा क्षेत्रातील अपूर्व योगदानाबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. १९८४मध्ये अर्जुन पुरस्कार, १९८५मध्ये पद्मश्री पुरस्कार, २०१९मध्ये IAAF व्हेटरन पिन पुरस्कार असे अनेक सन्मान त्यांना मिळाले. २०२२मध्ये त्यांना राज्यसभा सदस्यत्व देण्यात आले. सध्या त्या इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत.

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 06-02-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 196 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 06-02-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 196 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words