महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या राज्य शासनाच्या संस्थेकडून शिवम शिवस्वरूप भेंडे यांना पहिल्या टप्यातच मिळाला तब्बल ₹६८,५३७ इतका वैयक्तिक कर्जावरील व्याज परतावा. याबद्दल त्यांनी अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच विभागीय व्यवस्थापक प्रथमेश कुलकर्णी यांचेही त्यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना प्रत्यक्ष भेट घेऊन विशेष आभार मानले.
महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या राज्य शासनाच्या संस्थेकडून शिवम शिवस्वरूप भेंडे यांना पहिल्या टप्यातच मिळाला तब्बल ₹६८,५३७ इतका वैयक्तिक कर्जावरील व्याज परतावा. याबद्दल त्यांनी अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच विभागीय व्यवस्थापक प्रथमेश कुलकर्णी यांचेही त्यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना प्रत्यक्ष भेट घेऊन विशेष आभार मानले.
शिवम भेंडे यांनी सांगितले की, या योजनेमुळे त्यांच्या व्यवसायाला मोठा आधार मिळाला आहे. तसेच त्यांनी सांगितले की, समाजातील प्रत्येक घटकाने या योजनेचा लाभ घ्यावा.
इतरही अनेक योजना उन्नती देणाऱ्या असून नागरिकांनी त्यांचा लाभ घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले. योजनेची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नासाठी कोल्हापूर जिल्हा व्यवस्थापक प्रशांत जोशी यांचेही त्यांनी आभार मानले.
यांचा कागल 5 स्टार एमआयडीसी कोल्हापूर येथे प्लॅस्टिक मोल्डिंग मॅन्युफॅक्चरिंग चा व्यवसाय असून, या आर्थिक मदतीमुळे व्यवसाय अधिक सक्षमपणे पुढे नेणे शक्य आहे. त्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी घेतलेल्या वैयक्तिक कर्जावर अमृत या संस्थेच्या वतीने वैयक्तिक कर्ज व्याज परवा योजनेच्या अंतर्गत त्यांच्या कर्जावर त्यांना व्याज परतावा मिळाला आहे याबद्दल लाभार्थीने अमृत जिल्हा कार्यालय कोल्हापूर येथे भेट देऊन संस्थेचे आभार मानले व येणाऱ्या काळामध्ये अमृत या संस्थेच्या सर्व योजना अमृतकडे येणाऱ्या लक्षीत गटापर्यंत आम्ही आमच्या परीने सर्वतोपरी सहकार्य करून पोहोचवू व या संस्थेचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही देखील आपल्या सोबत प्रयत्न करू असे आपल्या प्रतिक्रिया मधून लाभार्थीने आपले मत व्यक्त केले.
अमृत ही संस्था फक्त वैयक्तिक कर्ज व्याज परतावा न देता व्यवसायिकांना त्यांच्या व्यवसायाचे व्यवस्थापन व व्यवसाय संदर्भात इतर योग्य पद्धतीचे मार्गदर्शन देऊन त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी देखिल प्रयत्न केले जातात याविषयी देखील लाभार्थीने आपल्या मनोगतातून समाधान व्यक्त केले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार,अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी,सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी,सेनगुनथर,गुजराथी,जाट,लोहाना, हिंदू नेपाळी, भूमिहार,हिंदू-वीरशैव लिंगायत,व अगरवाल इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी संपर्क - 9112228764 संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment