अमृतच्या व्याज परतावा योजनेतून छत्रपती संभाजीनगर येथील शुभम क्षीरसागर यांना ४१ हजार रुपयांचा लाभ!

शुभ स्नेह टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे संचालक शुभम मिलिंद क्षीरसागर यांना देवगिरी बँकेच्या कर्जावरील अमृत संस्थेच्या माध्यमातून ४१ हजार रुपयांपर्यंतचा व्याज परतावा मिळाला. याबद्दल त्यांनी अमृतच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा टीमचे आभार मानले. वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे योजनेचा लाभ मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

अमृतच्या व्याज परतावा योजनेतून छत्रपती संभाजीनगर येथील शुभम क्षीरसागर यांना ४१ हजार रुपयांचा लाभ! मुख्य फोटो
अमृतच्या व्याज परतावा योजनेतून छत्रपती संभाजीनगर येथील शुभम क्षीरसागर यांना ४१ हजार रुपयांचा लाभ! अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : शुभम मिलिंद क्षीरसागर यांना अमृत संस्थेच्या माध्यमातून ४१ हजार रुपयांपर्यंतचा व्याज परतावा मिळाला आहे. शुभम क्षीरसागर यांचा ‘शुभ स्नेह टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ हा व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी त्यांनी देवगिरी बँकेकडून कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते व्यवस्थित भरल्यानंतर त्यांना अमृतच्या व्याज परतावा योजनेतून हा लाभ मिळाला.

व्याज परतावा मिळाल्यानंतर शुभम क्षीरसागर यांनी आज अमृतच्या छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय व जिल्हा कार्यालयाला भेट दिली. यावेळी अमृत जिल्हा टीमच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. अमृत जिल्हा टीमने वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळे आपल्याला व्याज परताव्याचा लाभ मिळाला, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अमृत संस्था आणि जिल्हा टीमचे विशेष आभार मानले.

अमृत स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून विविध आर्थिक, शैक्षणिक व कौशल्यविकास योजनांचा लाभ लक्षित गटातील नागरिकांना दिला जात आहे. पात्र लाभार्थ्यांनी या योजनांची माहिती घेऊन जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन अमृतच्या वतीने करण्यात आले आहे.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 10-10-2026 News publication date | Time: 05:33 PM News publication time | Views: 272 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 10-10-2026 News publication date | Time: 05:33 PM News publication time | Views: 272 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement