कनेरसर, ता. खेड, जि. पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात राजगुरुनगरपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेले श्री क्षेत्र कनेरसर येथील यमाई देवी मंदिर हे धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले महत्त्वाचे तीर्थस्थळ आहे. रेणुकामातेचे रूप मानल्या जाणाऱ्या यमाई देवीला पंचक्रोशीतील अनेक भाविकांची कुलदेवता मानले जाते.‘ये माई’ या हाकेतून पडले यमाई नाव.
कनेरसर, ता. खेड, जि. पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात राजगुरुनगरपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेले श्री क्षेत्र कनेरसर येथील यमाई देवी मंदिर हे धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले महत्त्वाचे तीर्थस्थळ आहे. रेणुकामातेचे रूप मानल्या जाणाऱ्या यमाई देवीला पंचक्रोशीतील अनेक भाविकांची कुलदेवता मानले जाते.‘ये माई’ या हाकेतून पडले यमाई नाव
मंदिराच्या परिसरातील फलकावर नमूद केलेल्या आख्यायिकेनुसार, संत कान्होराज महाराज हे रेणुका मातेचे निस्सीम भक्त होते. वृद्धापकाळात त्यांनी रेणुका मातेला आपल्या गावाकडे येण्याची विनंती केली. देवीने त्यांची विनंती मान्य केली; मात्र “मागे वळून पाहू नका” अशी अट घातली.
देवी त्यांच्या मागून येत असताना तिच्या पैंजणांचा व पावलांचा आवाज ऐकू येत होता. कनेरसरच्या परिसरात हा आवाज अचानक बंद झाला. त्यामुळे कान्होराज महाराजांनी मागे वळून पाहिले असता देवी त्याच ठिकाणी अंतर्धान पावली. महाराजांनी देवीची मनोभावे स्तुती करून “ये माई, ये माई” अशी विनवणी केली. त्यामुळे या ठिकाणी प्रकट झालेल्या रेणुका मातेला ‘यमाई देवी’ हे नाव प्राप्त झाल्याची श्रद्धा आहे.
यात्रा, पालखी आणि धार्मिक परंपरा दर मंगळवारी देवीची आरती व मंदिर प्रदक्षिणा, तर प्रत्येक पौर्णिमेला गावातून देवीची पालखी मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. गुढीपाडव्याला विशेष धार्मिक कार्यक्रम होतात, तर चैत्र पौर्णिमेला कनेरसरची मोठी यात्रा भरते. नवरात्रोत्सवातही मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे ठिकाण धार्मिक श्रद्धेबरोबरच कनेरसरचे यमाई मंदिर हे इतिहास, लोकपरंपरा, शिल्पकला आणि ग्रामीण संस्कृतीचा अनुभव देणारे पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ शकते. राजगुरुनगरपासून जवळ असल्याने पुणे, चाकण, शिरूर तसेच परिसरातील भाविक व पर्यटक येथे सहज भेट देऊ शकतात.
राजगुरुनगरहून एसटी बस तसेच खासगी वाहनाने मंदिरापर्यंत पोहोचता येते. कनेरसरची यमाई देवी ही केवळ श्रद्धेचे स्थान नसून महाराष्ट्राच्या लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाची जपणूक करणारे एक महत्त्वपूर्ण तीर्थ-पर्यटन केंद्र आहे. या स्थळाचा योग्य पर्यटन विकास झाल्यास स्थानिक रोजगार, व्यवसाय आणि ग्रामीण पर्यटनालाही मोठी चालना मिळू शकते.
- संकलित
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment