शिरूरचे प्रांत अधिकारी श्री विठ्ठल दादा जोशी यांची अमृत संस्थेच्या प्रतिनिधींनी घेतली भेट

शिरूर : शिरूरचे विभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी, महसूल विभागातील जाणकार व कर्तव्यदक्ष अधिकारी श्री. विठ्ठल दादा जोशी सर यांची अमृत संस्थेच्या वतीने सदिच्छा भेट घेण्यात आली.

शिरूरचे प्रांत अधिकारी श्री विठ्ठल दादा जोशी  यांची अमृत संस्थेच्या प्रतिनिधींनी घेतली भेट मुख्य फोटो
मुख्य फोटो

शिरूर : शिरूरचे विभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी, महसूल विभागातील जाणकार, कर्तव्यदक्ष अधिकारी व मार्गदर्शक श्री. विठ्ठल दादा जोशी यांची अमृत संस्थेच्या वतीने सदिच्छा भेट घेण्यात आली.

या भेटीदरम्यान अमृत संस्थेच्या विविध योजना, उपक्रम तसेच नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या विविध लक्षित घटकांसाठीच्या योजनांची माहिती श्री. जोशी यांना देण्यात आली. समाजातील विविध घटकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अमृत संस्थेमार्फत करण्यात येणाऱ्या जनजागृती व मार्गदर्शन कार्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

अमृत संस्थेच्या माध्यमातून युवक, महिला, विद्यार्थी, शेतकरी तसेच विविध गरजू घटकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचवून त्यांना प्रशिक्षण व विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी अमृत संस्थेचे प्रतिनिधी कमलाकर कुलकर्णी यांनी अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती देत संस्थेच्या कार्याची माहिती श्री. विठ्ठल दादा जोशी यांना दिली. श्री. जोशी यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती जाणून घेत सकारात्मक प्रतिसाद दिला.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत  अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: कमलाकर कुलकर्णी News publisher name | Date: 01-10-2026 News publication date | Time: 11:14 PM News publication time | Views: 98 Number of times this news has been viewed | District: Pune Related district of the news
Publisher: कमलाकर कुलकर्णी News publisher name | Date: 01-10-2026 News publication date | Time: 11:14 PM News publication time | Views: 98 Number of times this news has been viewed | District: Pune Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement