अमृतच्या विविध योजना व उपक्रमांची विद्यार्थिनींना माहिती मिळावी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी यासाठी शारदा मंदिर कन्या प्रशालेत दर शनिवारी ‘अमृत वर्ग’ घेण्यात येणार आहे. तसेच विश्वबंधुत्व पंधरवाड्यासह अमृतच्या विविध उपक्रमांमध्ये शाळेचा सक्रिय सहभाग राहणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था यांच्या वतीने शारदा मंदिर कन्या प्रशाला, सरस्वती भुवन शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर येथे विश्वबंधुत्व पंधरवाडा घेण्याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा पांडे मॅडम यांची भेट घेण्यात आली. यावेळी त्यांना विश्वबंधुत्व पंधरवाडा शाळेत घेण्याबाबतचे पत्र देण्यात आले.
यावेळी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनी अमृतच्या विविध योजना, उपक्रम आणि विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. तसेच ‘अमृत वर्ग’ विद्यार्थ्यांसाठी कसा फायदेशीर ठरतो, त्यातून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी कशी मदत होते, याबाबतही माहिती देण्यात आली.
शारदा मंदिर कन्या प्रशालेत आता दर शनिवारी ‘अमृत वर्ग’ घेण्यात येणार आहे. या वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना विविध उपक्रमांची माहिती आणि त्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. तसेच अमृतच्या वतीने जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, सामाजिक, कौशल्य विकास आणि विद्यार्थ्यांसाठीच्या उपक्रमांमध्ये शारदा मंदिर कन्या प्रशालेचा सक्रिय सहभाग राहणार आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment