दारव्हा येथे अमृत संवाद सेतू अंतर्गत विद्यार्थ्यांनी जाणून घेतले पोलीस स्टेशनचे कामकाज

विद्यार्थ्यांना विविध शासकीय यंत्रणांचे कामकाज समजावे, प्रशासकीय प्रक्रियेची माहिती मिळावी तसेच त्यांच्यामध्ये सामाजिक जबाबदारी व जबाबदार नागरिकत्वाची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने अमृत संस्थेच्या वतीने ‘अमृत संवाद सेतू’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

दारव्हा येथे अमृत संवाद सेतू अंतर्गत विद्यार्थ्यांनी जाणून घेतले पोलीस स्टेशनचे कामकाज मुख्य फोटो
दारव्हा येथे अमृत संवाद सेतू अंतर्गत विद्यार्थ्यांनी जाणून घेतले पोलीस स्टेशनचे कामकाज अतिरिक्त फोटो

अमृत संवाद सेतू अंतर्गत विद्यार्थ्यांनी जाणून घेतले पोलीस स्टेशनचे कामकाज दारव्हा : विद्यार्थ्यांना विविध शासकीय यंत्रणांचे कामकाज समजावे, प्रशासकीय प्रक्रियेची माहिती मिळावी तसेच त्यांच्यामध्ये सामाजिक जबाबदारी व जबाबदार नागरिकत्वाची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने अमृत संस्थेच्या वतीने ‘अमृत संवाद सेतू’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत कै. वीरजी भीमजी घेरवडा हायस्कूल व महाविद्यालय, दारव्हा येथील विद्यार्थ्यांनी दारव्हा पोलीस स्टेशनला भेट देऊन पोलीस विभागाच्या कार्यपद्धतीची प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनमधील विविध विभागांची पाहणी करून दैनंदिन कार्यालयीन कामकाज, नागरिकांच्या तक्रारींची नोंद, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची भूमिका, गुन्ह्यांचा तपास तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांबाबत माहिती घेतली.

यावेळी पुरुषोत्तम बोबडे साहेब यांनी विद्यार्थ्यांना दारव्हा पोलीस स्टेशनच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देत पोलीस विभागाची कार्यपद्धती आणि समाजाच्या सुरक्षिततेमध्ये पोलिसांची महत्त्वपूर्ण भूमिका याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला कै. वीरजी भीमजी घेरवडा हायस्कूल व महाविद्यालयाचे मुख्याध्यापक सोमेश्वर चिरडे सर, नितीन देशपांडे सर, प्रशांत मानतुटे सर, परिमल दातार सर तसेच पर्यवेक्षक रेखा जोशी मॅडम यांच्यासह शाळेतील शिक्षक उपस्थित होते.

अमृतच्या वतीने जिल्हा व्यवस्थापक परीक्षित शर्मा व कामेश राखे यांची यावेळी उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना शासकीय यंत्रणांच्या कार्यपद्धतीची प्रत्यक्ष माहिती मिळावी आणि विविध क्षेत्रांतील कार्य समजून घेता यावे, यासाठी अशा संवादात्मक उपक्रमांचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.

‘अमृत संवाद सेतू’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष अनुभवातून प्रशासन व विविध शासकीय विभागांचे कामकाज समजून घेण्याची संधी मिळत आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्याबरोबरच त्यांच्यामध्ये सामाजिक बांधिलकी, कायद्याबद्दल आदर आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण होण्यास मदत होत आहे. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत दारव्हा पोलीस स्टेशनच्या भेटीबद्दल समाधान व्यक्त केले. अधिक माहितीसाठी संपर्क : परिक्षीत कमलकिशोर शर्मा जिल्हा व्यवस्थापक ९११२२२७६३३ जिल्हा कार्यालय पत्ता : स्वामी समर्थ विहार, पहिला माळा, फ्लॅट क्रमांक ए-१, अवधूतवाडी, तिवारी चौक, यवतमाळ - ४४५ ००१ ई-मेल : amrut.yavatmal.dm@gmail.com

Publisher: Parikshit Sharma News publisher name | Date: 09-09-2026 News publication date | Time: 11:50 AM News publication time | Views: 71 Number of times this news has been viewed | District: Yavatmal Related district of the news
Publisher: Parikshit Sharma News publisher name | Date: 09-09-2026 News publication date | Time: 11:50 AM News publication time | Views: 71 Number of times this news has been viewed | District: Yavatmal Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement