अमृत' संस्थेतर्फे पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील 'केशव सृष्टी ऑक्सिजन पार्क'ला सदिच्छा भेट; पर्यावरण संवर्धनाचा घेतला ध्यास

तारीख: ९ सप्टेंबर २०२६जव्हार:पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक बांधिलकी जपत 'अमृत' संस्थेच्या वतीने पालघर जिल्ह्यातील जव्हार (रामनगर) येथील प्रसिद्ध 'केशव सृष्टी ऑक्सिजन पार्क'ला नुकतीच एक विशेष सदिच्छा भेट देण्यात आली. ग्रामीण व आदिवासी भागातील शाश्वत विकास आणि निसर्गाशी जवळीक साधण्याच्या उद्देशाने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते

अमृत' संस्थेतर्फे  पालघर जिल्ह्यातील  जव्हार येथील 'केशव सृष्टी ऑक्सिजन पार्क'ला सदिच्छा भेट; पर्यावरण संवर्धनाचा घेतला ध्यास मुख्य फोटो
अमृत' संस्थेतर्फे  पालघर जिल्ह्यातील  जव्हार येथील 'केशव सृष्टी ऑक्सिजन पार्क'ला सदिच्छा भेट; पर्यावरण संवर्धनाचा घेतला ध्यास अतिरिक्त फोटो

'केशव सृष्टी ऑक्सिजन पार्क' हे सुमारे ६,००० बांबूच्या झाडांची लागवड करून निर्माण केलेले एक निसर्गरम्य आणि पर्यावरणपूरक केंद्र आहे. अमृत संस्थेच्या कोकण विभागीय व्यवस्थापक श्री मंगेश खाडीलकर ह्यांचे आगमन झाल्यानंतर केशव सृष्टीच्या प्रतिनिधींनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. पालघर जिल्हा उपव्यवस्थापक अमृत श्री अमित उदय आठवले हे देखील तिथे उपस्थित होते ,केशव सृष्टी च्या वतीने प्रोजेक्ट प्रमुख श्री कैलास कुरकुटे ह्यांनी मार्गदर्शन केले.


निसर्गाचा अनुभव आणि माहिती:—या भेटीदरम्यान अमृत संस्थेच्या सदस्यांनी संपूर्ण पार्कची पाहणी केली. या पार्कमध्ये बांबू लागवडीच्या माध्यमातून स्थानिक आदिवासी महिला व तरुणांना रोजगार कसा उपलब्ध करून दिला जातो (प्रोजेक्ट ग्रीन गोल्ड), याची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. तसेच, शहरी धावपळीतून दूर येऊन निसर्गाच्या सानिध्यात 'डिजिटल डिटॉक्स' (Digital Detox) कसा करता येतो, याचा प्रत्यक्ष अनुभवही सदस्यांनी घेतला.

मान्यवरांचे मनोगत:—या प्रसंगी बोलताना अमृत संस्थेच्या कोकण विभागीय व्यवस्थापक ह्यांनी संगितले "केशव सृष्टीने उभे केलेले हे ऑक्सिजन पार्क केवळ एक पर्यटन स्थळ नसून, पर्यावरण समतोल राखणारा आणि स्थानिक रोजगाराला चालना देणारा एक आदर्श प्रकल्प आहे.तसेच महिला आणि तरुणांना अमृत पेठ च्या माध्यामातून रोजगार उपलब्ध करून देऊ .

अधिक महितीसाठी संपर्क : अमृत पालघर अमित उदय आठवले 9112226530

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Amit Uday Athavale News publisher name | Date: 09-09-2026 News publication date | Time: 08:47 PM News publication time | Views: 56 Number of times this news has been viewed | District: Palghar Related district of the news
Publisher: Amit Uday Athavale News publisher name | Date: 09-09-2026 News publication date | Time: 08:47 PM News publication time | Views: 56 Number of times this news has been viewed | District: Palghar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement