१६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ निर्माण करणारे माऊली ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशवे त्या काळातील " जेन झी" च"
"जेन झी" म्हणजे जनरेशन झेड ही १९९७ ते २०१२ या कालावधीत जन्मलेल्या तरुणाची पिढी आहे. मिलेनियल्स (Gen Y) नंतर आणि जनरेशन अल्फाच्या आधी येणारी ही तरुण पिढी आहे. लहानपणापासूनच इंटरनेट, स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या संपर्कात वाढल्यामुळे यांना 'डिजिटल नेटिव्हज' (Digital Natives) म्हटले जाते.याची सध्या जगभर चर्चा सुरू आहे. अर्थातच कुठल्याही देशातील हुशार सुसंस्कृत तरुणाई ही त्या देशाची संपत्ती असते.तरुणाईची ऊर्जा ,विचार, व कर्तृत्व हे त्या देशाचे भविष्य ठरवते.सध्या बोलबाला असलेल्या "जेन झी" चे विचार त्यांच्या अपेक्षा त्यांची स्वप्न यावर मंथन सुरू आहे. सध्या जगात विकासाची मोठी स्पर्धा सुरू आहे. अर्थातच ही स्पर्धा भौतिक विकासाची आहे.त्याच बरोबर वैज्ञानीक प्रगतीची आहे. आज जगात व्यक्तिगत स्तरावर सांपत्तिक स्थिती भौतिक सुख प्रचंड प्रमाणात असणारे बहुसंख्य लोक आहे.मात्र देश विदेशातील कौटुंबिक निरीक्षणे काय सांगतात ? तर अनेक श्रीमंत मानसिक स्वास्थ्याच्या, समाधानाच्या शोधत आहेत. याउलट भारतात एवढी विशाल लोकसंख्या व वैविध्यता असूनही असे त्या प्राप्त परिस्थितीत समाधानाने जीवन व्यतीत करण्याची मानसिक समज किंवा जी कला आढळून येते, त्याचा मुख्य गाभा भारतीय तत्त्वज्ञानात ,व अध्यात्म विचारात दडलेला आहे. राष्ट्रासाठी व समाजाच्या कल्याणासाठी आयुष्य समर्पित केलेले अनेक महानुभाव या देशात होऊन गेले.त्या त्या काळात समाजाच्या उत्कर्षासाठी जे जे आवश्यक आहे ते ते देणारे त्या काळातील "जेन झी" म्हटले तर वावगे ठरणार नाही.उदाहरणच द्यायचे झाल्यास ७५० वर्षापूर्वी अक्रांतांच्या राजकीय व सांस्कृतिक वर्चस्वाने दबलेल्या समाजव्यवस्थेत माता पित्या विन पोरक्या झालेल्या संतश्रेष्ठ निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या भावंडांपैकी संत ज्ञानेश्वर यांनी मोठी क्रांती केली. समाजाने उपहास केलेल्या भावंडांना मांडे भाजण्यासाठी साधे मडके , खापर मिळू न दिल्याने दुःखी , कष्टी व्यथित झालेल्या संत ज्ञानेश्वरांना चिमुकली "जेन झी" मुक्ताई ऊर्जा देते योगी पावन मनाचा । साही अपराध जनाचा !!1!! विश्व रागें झाले वन्ही । संती सुखें व्हावें पाणी !!2!! शब्द शस्त्रें झालें क्लेश । संती मानावा उपदेश !!3!! विश्व पट ब्रह्म दोरा । ताटी उघडा ज्ञानेश्वर !!4!! आणि पुढे जाऊन संत ज्ञानेश्वर वयाच्या सोळाव्या वर्षी ग्रंथराज ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ रचना करतात. आज अभ्यासाकांना ज्ञानेश्वरी ग्रंथ अध्यात्मा पासून विज्ञानापर्यंत जिज्ञासा निर्माण करणारा ग्रंथ म्हणून वेगवेगळ्या भाषेत प्रसिद्ध होत आहे. व मार्गदर्शक ठरत आहेत.. म्हणूनच ज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञान विचारात घेतले तर संपूर्ण जगाला शांती, समरसता, बंधुता , आत्मिक समाधान देण्याची शक्ती व शिकवण देणारा ग्रंथ आहे,हे सर्वमान्य आहे. त्याची निर्मिती करणारे संत ज्ञानेश्वर हे जगातील "जेन झी" चे आदर्श म्हटले तर वावगे ठरू नये.. याव्यतिरिक्त देखील या भारत वर्षात अनेक तरुणांनी त्या त्या काळात अत्यंत प्रेरणादायी कार्य केले आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाव्या वर्षी तोरणा जिंकला.. अवघ्या 20 व्या वर्षी पेशवे पद मिळवून पुढील 20 वर्षात 41 युद्ध जिकूंन आपराजित योद्धा म्हणून कीर्ती मिळवणारे श्रीमंत बाजीराव पेशवे आपले आदर्श का असू नये. स्वामी विवेकानंद यांनी 16 व्या वर्षी शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग यश प्राप्त केले. जगामध्ये जे काही चांगले आहे त्याचा नक्कीच स्वीकार करावा परंतु आपल्याकडे जे जे काही उत्तम आहे त्याचा विसर न व्हावा!हे देखील तितकेच खरे.. भारतातील जेन झी याचा नक्कीच अभ्यास करून आपल्या जीवनाची दिशा ठरवतील असा आस विश्वासस बाळगतो... -श्री राधेश्याम कुलकर्णी (लोकतंत्र मिरर - जिल्हा प्रतिनिधी )
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment