रोजगार महाकुंभ : २९ सप्टेंबरला अकोला जिल्ह्यात ११ ठिकाणी रोजगार मेळावे

नोकरीइच्छुक युवक-युवतींना रोजगाराची संधी; ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन

रोजगार महाकुंभ : २९ सप्टेंबरला अकोला जिल्ह्यात ११ ठिकाणी रोजगार मेळावे मुख्य फोटो
मुख्य फोटो

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने ‘रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र’ अंतर्गत अकोला जिल्ह्यात २९ सप्टेंबर २०२६ रोजी ११ ठिकाणी रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील नोकरीइच्छुक युवक-युवतींनी या संधीचा लाभ घेऊन रोजगार मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांच्या वतीने करण्यात आले आहे. राज्यभरातील युवक-युवतींना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देणे तसेच नियोक्ता व नोकरीइच्छुक उमेदवारांना एकाच व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या राज्यव्यापी रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी अर्जामध्ये आवश्यक माहिती अचूकपणे भरून नोंदणी करणे आवश्यक आहे. अकोला जिल्ह्यातील रोजगार मेळाव्याची ठिकाणे 1. अकोला इंडस्ट्री असोसिएशन हॉल,(MIDC) अकोला . 2. शंकरलाल खंडेलवाल कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, अकोला 3. श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय, अकोला 4. दि प्रोफेशनल कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, गौरक्षण रोड, अकोला 5. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मूर्तिजापूर . 6. रसिकलालजी धारीवाल खाजगी औ.प्र.संस्था, आलेगांव ता. पातूर जि. अकोला 7. डॉ. एच. एन. सिन्हा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पातूर 8. मानव स्कूल ऑफ पॉलिटेक्निक - व्याळा, अकोला 9. श्रीमती कमलाबाई देशमुख खाजगी औ.प्र.संस्था, कान्हेरी ता. बार्शिटाकळी, जि.अकोला 10. श्री. शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोट आणि लघु उद्योग भारती, अकोला 11. डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालय, तेल्हारा ऑनलाइन नोंदणी आवश्यक रोजगार महाकुंभामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खालील ऑनलाइन अर्जाद्वारे नोंदणी करावी. अर्ज भरताना वैयक्तिक, शैक्षणिक व रोजगारासंदर्भातील माहिती अचूकपणे नमूद करावी. नोंदणी लिंक : https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7 अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला येथे संपर्क साधता येईल. संपर्क क्रमांक : 9130419585, 9767852758, 9545000093 अकोला जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरीइच्छुक युवक-युवतींनी या रोजगार महाकुंभात सहभागी होऊन उपलब्ध रोजगार संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत  अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/



Publisher: Prachi Deo News publisher name | Date: 08-09-2026 News publication date | Time: 02:45 PM News publication time | Views: 807 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news
Publisher: Prachi Deo News publisher name | Date: 08-09-2026 News publication date | Time: 02:45 PM News publication time | Views: 807 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement