बुलढाणा जिल्हात 'अमृत सूर्य मित्र' प्रशिक्षणाचा उत्साहपूर्ण समारोप

बुलढाणा : महाराष्ट्र शासनाच्या AMRUT उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘अमृत सूर्य मित्र – सोलर पीव्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स’ प्रशिक्षण बॅचचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

बुलढाणा जिल्हात 'अमृत सूर्य मित्र'  प्रशिक्षणाचा उत्साहपूर्ण समारोप मुख्य फोटो
मुख्य फोटो

बुलढाणा जिल्हात 'अमृत सूर्य मित्र' प्रशिक्षणाचा उत्साहपूर्ण समारोप प्रशिक्षणानंतर तत्काळ व्यवसायाची सुरुवात; प्रशिक्षणार्थीने पूर्ण केल्या तीन सोलर ऑर्डर्स बुलढाणा : महाराष्ट्र शासनाच्या AMRUT उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘अमृत सूर्य मित्र – सोलर पीव्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स’ प्रशिक्षण बॅचचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

समारोप कार्यक्रमास श्री. प्रवीण कोळेश्वर, विभागीय व्यवस्थापक, श्री. जिग्नेश जी. कमानी, जिल्हा व्यवस्थापक, विवेकानंद आश्रमचे सचिव गोरे सर, MCED चे PO श्री. गणेश गुप्ता, नंदकिशोर मगर, डेटा एन्ट्री ऑपरेटर यांच्यासह संबंधित अधिकारी, प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

या प्रशिक्षणाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर एका प्रशिक्षणार्थीने तत्काळ स्वतःच्या व्यवसायाची सुरुवात करून सोलर क्षेत्रातील तीन ऑर्डर्स यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. प्रशिक्षणातून मिळालेले तांत्रिक ज्ञान, प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि मार्गदर्शन यांचा उपयोग करून प्रशिक्षणार्थींनी रोजगाराच्या संधी शोधण्याऐवजी स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या दिशेने ठोस पाऊल उचलले आहे. ही बाब AMRUTच्या प्रशिक्षण उपक्रमाच्या परिणामकारकतेचे उत्तम उदाहरण असून, ‘प्रशिक्षणातून कौशल्य, कौशल्यातून व्यवसाय आणि व्यवसायातून रोजगारनिर्मिती’ या उद्दिष्टपूर्तीकडे टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. सोलर क्षेत्रात वाढत्या रोजगार व व्यवसायाच्या संधी लक्षात घेता, AMRUTच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना आधुनिक सौर तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षणानंतर प्रशिक्षकांच्या माध्यमातून पात्र प्रशिक्षणार्थींना रोजगाराच्या संधी व जॉब ऑफर्स उपलब्ध करून देण्याची कार्यवाहीही करण्यात येत आहे. याशिवाय, सोलर क्षेत्रातील प्रशिक्षणार्थी, ग्राहक, सेवा व व्यवसायाच्या संधी यांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी ‘AMRUT Solar’ विषयक ॲप विकसित करण्याची प्रक्रिया सुरू असून, भविष्यात या माध्यमातून सोलर क्षेत्रातील प्रशिक्षणार्थींना अधिक व्यापक संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. बुलढाणा जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अल्पावधीतच प्रत्यक्ष व्यवसाय सुरू करून ऑर्डर्स पूर्ण केल्याने, कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ प्रमाणपत्रापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष रोजगार व व्यवसायनिर्मितीचे प्रभावी माध्यम ठरू शकते, हे अधोरेखित झाले आहे. AMRUTच्या माध्यमातून सोलर क्षेत्रासह विविध रोजगाराभिमुख व उद्योजकता विकास प्रशिक्षणांद्वारे युवकांना कौशल्य, मार्गदर्शन, रोजगाराच्या संधी आणि स्वयंरोजगारासाठी आवश्यक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

 

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Jignesh Kamani News publisher name | Date: 08-09-2026 News publication date | Time: 06:23 AM News publication time | Views: 44 Number of times this news has been viewed | District: Buldhana Related district of the news
Publisher: Jignesh Kamani News publisher name | Date: 08-09-2026 News publication date | Time: 06:23 AM News publication time | Views: 44 Number of times this news has been viewed | District: Buldhana Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement