सोलापूरच्या यशराज काळे यांच्या व्यवसायाला गती; अमृत संस्थेचे मानले आभार!
सोलापूर महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी' (अमृत - AMRUT) या संस्थेच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या वैयक्तिक व्याज परतावा योजने चा प्रभावी वापर करून सोलापूर येथील तरुण व्यावसायिक यशराज सचिन काळे यांनी आपल्या व्यवसायात यश मिळवले आहे.
देशमुख प्लॉट, सोलापूर येथील रहिवासी असलेल्या यशराज काळे यांनी आपल्या 'यशराज फोटोज अँड डिजिटल्स' या फोटोग्राफीच्या दुकानासाठी 'अमृत' संस्थेच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेअंतर्गत लाभ घेतला. या आर्थिक पाठबळामुळे त्यांना व्यवसायाचा विस्तार करणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाची साधने उपलब्ध करून घेणे शक्य झाले.
सध्या त्यांचे 'यशराज फोटोज अँड डिजिटल्स' हे दुकान उत्तम प्रकारे चालत असून ग्राहकांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेमुळे व्यवसायातील आर्थिक भार कमी होऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मोठी मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.
"अमृत संस्थेच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेमुळे माझ्या फोटोग्राफी व्यवसायाला मोठी उभारी मिळाली आहे. या मदतीबद्दल मी 'अमृत' प्रबोधिनी आणि शासनाचा मनापासून आभारी आहे.
यशराज सचिन काळे , खुल्या प्रवर्गातील नवउद्योजकांना स्वावलंबी बनवण्यासाठी 'अमृत' संस्थेच्या योजना अत्यंत उपयुक्त ठरत असून, यशराज काळे यांच्या यशाचे शहरात कौतुक होत आहे.
अमृत (AMRUT) जिल्हा कार्यालय, १०८-ए, श्री साई बिल्डिंग,
तिसरा मजला, यतिराज हॉटेलजवळ, सात रस्ता, सोलापूर - ४१३००१.
संपर्क:- ९११२२२८७६८
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment