लातूर येथे दीनदयाळ बँक, अहमदपूर शाखेत अमृतच्या योजनांची दिली माहिती

अहमदपूर येथील दीनदयाळ बँक शाखेत शाखाधिकारी श्री. विनोद कानेगावकर यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी अमृतचे जिल्हा उपव्यवस्थापक चिंतेश जोशी यांनी अमृतच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली.

लातूर येथे दीनदयाळ बँक, अहमदपूर शाखेत अमृतच्या योजनांची दिली माहिती  मुख्य फोटो
लातूर येथे दीनदयाळ बँक, अहमदपूर शाखेत अमृतच्या योजनांची दिली माहिती  अतिरिक्त फोटो

लातूर,: महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने अहमदपूर येथील दीनदयाळ बँक शाखेत शाखाधिकारी श्री. विनोद कानेगावकर यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी अमृतचे जिल्हा उपव्यवस्थापक चिंतेश जोशी यांनी अमृतच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली.

बैठकीत अमृतच्या मुख्य व्याज परतावा योजनेवर विशेष चर्चा करण्यात आली. पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी बँक स्तरावर आवश्यक सहकार्य, समन्वय आणि लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्याबाबत माहिती देण्यात आली. अमृतच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी बँकेने सहकार्य करावे, असे आवाहन चिंतेश जोशी यांनी केले.

यावेळी ‘अमृत पराक्रम दिन’ उपक्रमाचीही माहिती देण्यात आली. दिनांक १८ ऑगस्ट म्हणजेच श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये इतिहास, शौर्य आणि राष्ट्रभक्तीची भावना रुजविण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा व उपक्रमांबाबत माहिती देण्यात आली.

तसेच ‘अमृत सक्षम’ उपक्रमाच्या माध्यमातून कौशल्य विकास, प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

‘अमृत वर्ग’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिला जात असून योग, व्यायाम, खेळ, संस्कार आणि सकारात्मक विचारांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगण्यात आले. यासोबतच ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणीच्या माध्यमातून युवक व उद्योजकांना उपलब्ध होणाऱ्या व्यवसायाच्या नव्या संधींबाबतही माहिती देण्यात आली.

बैठकीस शाखाधिकारी श्री. विनोद कानेगावकर, श्री. ओंकार कुलकर्णी, श्री. अभिजीत देशमुख, श्री. अमर पाटील, श्री. विशाल चाटे, श्री. कपिलेश्वर कोनाले यांच्यासह बँकेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अमृतच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवून पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी बँक व अमृत यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्याबाबत यावेळी सकारात्मक चर्चा झाली. अधिक माहितीसाठी संपर्क : शुभम मुळजकर जिल्हा व्यवस्थापक,लातूर अमृत कार्यालय,लातूर संपर्क क्रमांक- 7391065470 पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट ,सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Chintesh Joshi News publisher name | Date: 13-08-2026 News publication date | Time: 03:35 PM News publication time | Views: 55 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news
Publisher: Chintesh Joshi News publisher name | Date: 13-08-2026 News publication date | Time: 03:35 PM News publication time | Views: 55 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement