अमृत पराक्रम दिनानिमित्त चाळीसगाव येथील तात्यासाहेब सामंत विद्यालयात विद्यार्थ्यांना झाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या कार्य कर्तृत्त्वाचा परिचय !

व्याख्याते आणि श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या मामांचे वंशज श्री. चंद्रशेखर बर्वे यांचे व्याख्यान आयोजित केले होते.

अमृत पराक्रम दिनानिमित्त चाळीसगाव येथील  तात्यासाहेब सामंत विद्यालयात विद्यार्थ्यांना झाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या कार्य कर्तृत्त्वाचा परिचय ! मुख्य फोटो
अमृत पराक्रम दिनानिमित्त चाळीसगाव येथील  तात्यासाहेब सामंत विद्यालयात विद्यार्थ्यांना झाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या कार्य कर्तृत्त्वाचा परिचय ! अतिरिक्त फोटो

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंती दिनांक १८ ऑगस्ट रोजी असते. त्यानिमित्त अमृततर्फे अमृत पराक्रमदिन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत निबंध,वक्तृत्व आणि रील्स/शोर्ट स्पर्धा घेण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत अजून एक विशेष कार्यक्रम राज्यभर राबविला जात आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या अतुलनीय पराक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना आणि सामान्य नागरिकांना व्हावी या उद्देशाने राज्यभर त्यांच्या जीवनावर आधारीत व्याख्यानमालांचे आयोजन करण्यात आले आहे.

इतिहास अभ्यासक आणि वक्ते विविध शाळा व आस्थापनांमध्ये जाऊन याविषयीचे आपले विचार मांडत आहेत.

याचाच एक भाग म्हणून चाळीसगाव येथील तात्यासाहेब सामंत विद्यालयात व्याख्याते आणि श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या मामांचे वंशज श्री. चंद्रशेखर बर्वे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

हे व्याख्यान मोठया उत्साहात संपन्न झाले . प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली.

व्याख्याते श्री चंद्रशेखर बर्वे यांनी थोरले बाजीराव पेशवे यांचा पराक्रम,धाडस, स्वामिनिष्ठ आचरण, दरारा,अपराजित नेतृत्व व जीवनातील काही प्रसंग गोष्टीरूपाने साध्या व सोप्या शब्दात विद्यार्थ्यांना सांगितले.

तसेच अमृत स्पर्धेविषयी माहिती देत स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन केलं.

कार्यक्रमास मुख्यध्यापक श्री सूर्यवंशी सर,देशपांडे सर,अमृताचे विनोद देशपांडे,शिक्षकवृंद व ४५० विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

कार्यक्रमाचा समारोप जो जिता वही बाजीराव च्या जयजयकाराने झाला.

अधिक माहितीसाठी संपर्क- ९११२२२८७७०

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 13-08-2026 News publication date | Time: 01:56 PM News publication time | Views: 80 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 13-08-2026 News publication date | Time: 01:56 PM News publication time | Views: 80 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement