अमृत पराक्रम दिन दौऱ्यानिमित्त ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आणि वक्ते मा.जगन्नाथ लडकत यांचे बुलडाणा येथे व्याख्यान आयोजन

बुलडाणा येथे विविध महाविद्यालयात सांगणार श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची शौर्यगाथा -

अमृत पराक्रम दिन  दौऱ्यानिमित्त  ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आणि वक्ते मा.जगन्नाथ लडकत यांचे बुलडाणा  येथे व्याख्यान आयोजन मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त १८ ऑगस्ट हा दिवस राज्यभरात 'पराक्रम दिन' म्हणून साजरा करण्यात येत आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्याचा, पराक्रमाचा व राष्ट्रनिष्ठेचा परिचय नवीन पिढीला व्हावा, या उद्देशाने राज्यभरात १ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विविध राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. अवघ्या चाळीस वर्षांच्या आयुष्यात एकही लढाई न हरलेले, आपल्या पराक्रमाने दिल्लीच्या तख्तालाही हादरा देणारे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे हे भारतीय इतिहासातील सर्वश्रेष्ठ सेनानींपैकी एक मानले जातात. त्यांचे धैर्य, दूरदृष्टी, राष्ट्राभिमान आणि विजिगीषू वृत्ती आजच्या पिढीसमोर आदर्श म्हणून उभी राहावी, यासाठीच हा प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. अजिंक्य योद्धा, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या कार्याचा परिचय जनतेला, विशेषतः युवकांना होण्यासाठी महाराष्ट्रभर अनेक जिल्ह्यात व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेल्या आहेत. यासाठी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आणि वक्ते मा.जगन्नाथ लडकत यांचा राज्यव्यापी दौरा सुरु झाला आहे. या दौऱ्याची सुरुवात नाशिक विभागापासून झाली असून मराठवाडा, अमरावती, आणि नागपूर विभाग, त्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हा दौरा होणार आहे.

जगन्नाथ लडकत हे 'समर्थ पुणे परिवार' या संस्थेचे संस्थापक असून सांस्कृतिक, ऐतिहासिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. ते संस्कृती प्रतिष्ठान, पुणेचे मुख्य विश्वस्त आहेत. इतिहास विषयाचा त्यांचा सखोल अभ्यास असून त्यांच्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहात दोन हजारांहून अधिक पुस्तके आहेत. गडकिल्ल्यांवर आधारित दिनदर्शिकेचे प्रकाशन, 'अजिंक्य योद्धा बाजीराव आणि पालखेडची लढाई' या विषयावर राज्यभरातील २२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांसमोर व्याख्याने, बाजीराव पेशव्यांवरील बुकमार्कचे प्रकाशन व वितरण तसेच 'प्रतापी पेशव्यांचे आयुष्यमान व शनिवारवाडा' या विषयावर शोधनिबंध लेखन अशी त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे. सध्या ते अठराव्या शतकाच्या इतिहासाचा अभ्यास करत असून विविध वृत्तपत्रांमध्ये इतिहास विषयक लेखनही करीत आहेत. या महाराष्ट्र दौऱ्याअंतर्गत दिनांक ११ ऑगस्ट रोजी बुलडाणा येथे त्यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत मा.श्री.जगन्नाथ लडकत यांचा बुलडाणा दौरा व्याख्यान कार्यक्रम खालीलप्रमाणे-

दिनांक- ११ ऑगस्ट २०२६

वेळ- सकाळी १० ते ११.३०

स्थळ- एडेड महाविद्यालय ,बुलडाणा

दिनांक- ११ ऑगस्ट २०२६

वेळ- दुपारी १.३० ते ३.००

स्थळ- आदर्श महाविद्यालय ,चिखली

कार्यक्रम दिलेल्या वेळेतच सुरु होईल. या कार्यक्रमास तरुण,महिला,विद्यार्थी,शिक्षक आणि पालक यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन,आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Publisher: Jignesh Kamani News publisher name | Date: 11-08-2026 News publication date | Time: 12:45 PM News publication time | Views: 70 Number of times this news has been viewed | District: Buldhana Related district of the news
Publisher: Jignesh Kamani News publisher name | Date: 11-08-2026 News publication date | Time: 12:45 PM News publication time | Views: 70 Number of times this news has been viewed | District: Buldhana Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement