जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याच्या मीनाक्षीताई निकम- सक्षम स्त्री शक्तीचे आदर्श उदाहरण

आपल्याला मायेचा उबदार स्पर्श देणारी गोधडी आणि या गोधडीची निर्यात करणाऱ्या मीनाक्षी राजाराम निकम यांनी अमृतच्या ईडीपी कार्यक्रमास आपला अमूल्य वेळ दिला. त्यांचा संघर्ष हा भविष्यकाळात व्यवसाय सुरु करणाऱ्या तरुणांना नक्कीच प्रेरणादायी आहे.

जळगाव जिल्ह्यातील  चाळीसगाव तालुक्याच्या  मीनाक्षीताई निकम- सक्षम स्त्री शक्तीचे आदर्श उदाहरण  मुख्य फोटो
जळगाव जिल्ह्यातील  चाळीसगाव तालुक्याच्या  मीनाक्षीताई निकम- सक्षम स्त्री शक्तीचे आदर्श उदाहरण  अतिरिक्त फोटो

आपली इच्छाशक्ती प्रबल असेल कोणतीही शारीरिक व्याधी अडचण ठरत नाही याचे आदर्श उदाहरण म्हणजे मीनाक्षीताई राजाराम निकम!

यांचा जन्म ८ ऑगस्ट १९७३ रोजी झाला.लहानपणीच शारीरिक व्यंगामुळे त्यांना शालेय शिक्षण पूर्ण करता आले नाही. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना वैद्यकीय मदत मिळू शकली नाही. त्यात त्यांची अपंगता इतकी गंभीर होती की त्यांना व्हीलचेयर शिवाय हालचाल करणे शक्य नव्हते. त्यांनी नियमित शाळेत जाऊ शकल्या नाहीत परंतु परीक्षेसाठी हजर राहून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्या १४ व्या वर्षांच्या असताना

त्यांच्यावर आणखी एक संकट आले जेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे कुटुंब निराधार झाले कारण त्यांची आई, दोन धाकटे भाऊ आणि दोन धाकट्या बहिणी अशा कुटुंबाची सर्व जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. मीनाक्षी ताईनी शिलाई काम सुरू केले. त्यांनी कुटुंबाची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली आणि आपल्या दोन्ही धाकट्या भावांना आणि दोन्ही धाकट्या बहिणींना शिक्षण दिले . कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना मीनाक्षी ताईनी दिव्यांग महिलांना सशक्त बनवण्याचा निर्णय घेतला. त्या उद्देशाने त्यांनी राज क्लासेस नावाची शिलाई प्रशिक्षण संस्था सुरू केली. या प्रशिक्षण संस्थेतून २००० हून अधिक महिला प्रशिक्षित झाल्या. त्यांनी स्वयंरोजगार उभा केला आहे. त्यांनी जुलै २०१६ मध्ये त्यांनी स्वयंदीप या प्रकल्पाची सुरुवात केली ज्यामध्ये ३० हून अधिक मुली, ज्यांना दोन्ही पायांनी अपंगत्व आहे त्यांना प्रशिक्षण दिले जाते आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी स्वयंरोजगार उभा केला आहे. या संस्थेने २०० हून अधिक दिव्यांग आणि वंचित महिलांना निरंतर रोजगार देण्यासाठी खडकी बुद्रुकएमआयडीसी चाळीसगाव येथे २५००० चौरस फुटाचा वस्त्र निर्मितीचा कारखाना ,स्वयंजीत महिला संघ, या नावाने सुरू केला. या कारखान्यात शाळा युनिफॉर्म, हॉस्पिटल युनिफॉर्म फॅक्टरी युनिफॉर्म इत्यादी तयार केले जातात. अनेक सामाजिक संस्था आणि सरकारी संस्थांसोबत सामंजस्य करार करून दिव्यांगांसाठी पुनर्वसन कार्यक्रम आणि प्रशिक्षण शिबिरे आयोजित करतात. तसे दिव्यांगांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात सहभागी होतात.

मीनाक्षी निकम या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे सिनेट सदस्य म्हणून कार्यरत आहेत अपंग स्मृती या साप्ताहिक मासिकाचे सहसंपादक आहेत हे मासिक सामाजिक जागरूकतेसाठी आणि विकलंगांसाठी पूर्णपणे समर्पित आहे . त्यांचा 'व्यथा' नावाचा एक काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून ज्यामध्ये दिव्यांगांचे दुःख आणि कष्ट प्रकट केले आहेत.

विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने त्या दिव्यांगांना वैद्यकीय सहाय्य आणि आधार प्रणाली- जसे चालण्याची साधने, श्रवण आणि दृष्टी साधने कृत्रिम अवयव आणि शस्त्रक्रिया उपकरणे इत्यादी मोफत प्रदान करतात. त्यांनी विविध शासकीय योजनांची माहिती देणारा मेळावा आयोजित केला आहे. याद्वारे शासकीय अधिकारी व सहकारी वर्गाला एकत्र जमा करून दिव्यांगांसाठी ज्या योजना असतात त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा हेतू आहे. मीनाक्षी निकम यांनी नियमितपणे विविध उपक्रमांबाबत वृत्तपत्रांमध्ये लेख आणि स्तंभ लेखन लिहिले आहेत. मीनाक्षी निकम यांनी दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी आजही काम करतात.

अशा या मीनाक्षीताई निकम स्वतः व्हील चेअरवर आणि एका मदतनीसाला सोबत घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करतात. त्यांचा आणखी एक अनोखा प्रकल्प म्हणजे गोधडी प्रकल्प! ही आपली पारंपारिक गोधडी थंडीत मायेची उब देते. याचा गोधडीचा व्यवसाय करून त्यांनी ह्या गोधड्यांची निर्यात सुरु केली. त्यांच्या गोधडीला भरपूर काही मागणी आहे. जन्म झाल्यापासून बाळाला लागणाऱ्या कपड्यांपासून ते शाळेत जाणाऱ्या मुला मुलींना लागणारे गणवेश तसेच शोभेच्या वस्तू,अलंकार,लग्नात वधूवरांना लागणारे कपडे, चपला,टोप्या,राख्या अशी अनेक उत्पादने त्यांच्या संस्थेत तयार होत असतात.

त्यांच्या या चौफेर व्यावसायिक अनुभवामुळेच त्यांना जळगाव जिल्हा अमृत कार्यालयाने उद्योजकता स्टार्टअप ते थेट यशस्वी उद्योजक या अंतर्गत निमंत्रित केले होते .त्यांनी चाळीसगाव येथील वीस लाभार्थ्यांना चांगले मार्गदर्शनही केले. भविष्यात अमृत संस्थेशी व्यावसायिक करार करण्याची इच्छासुद्धा प्रकट केली आहे. अमृतचे जळगाव जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र कानडे यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत त्यांनी ही इच्छा व्यक्त केली.

प्रबल इच्छाशक्तीच्या जोरावर शारीरिक व्यंगावर मात करत फक्त स्वत:च नाही तर अशा असंख्य महिलांना सक्षम करणाऱ्या मीनाताई या खरोखरच अद्भुत आहेत.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Rajendra Kanade News publisher name | Date: 30-07-2026 News publication date | Time: 01:51 PM News publication time | Views: 137 Number of times this news has been viewed | District: Jalgaon Related district of the news
Publisher: Rajendra Kanade News publisher name | Date: 30-07-2026 News publication date | Time: 01:51 PM News publication time | Views: 137 Number of times this news has been viewed | District: Jalgaon Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement