भारतरत्न सर विश्वेश्वरय्या शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेत नवीन राष्ट्रीय संस्थांचा समावेश, २०० लाभार्थी मर्यादा आणि ऑगस्ट २०२६ पासून अर्ज प्रक्रियेस होणार सुरुवात
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना देशातील नामांकित उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्र संशोधन उन्नती प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न सर विश्वेश्वरय्या शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेत चालू शैक्षणिक वर्षापासून महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.
सुधारित योजनेनुसार AIIMS, IIT, IIM आणि IIIT या संस्थांव्यतिरिक्त खालील राष्ट्रीय स्तरावरील संस्थांचाही समावेश करण्यात आला आहे – • National Institute of Design (NID) • Institute of Chemical Technology (ICT) • Indian Institute of Science (IISc) • Indian Institutes of Science Education and Research (IISER) • Indian Institute of Foreign Trade (IIFT)
योजनेचा मुख्य उद्देश
• आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना देशातील प्रतिष्ठित राष्ट्रीय संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे. • गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीमुळे शिक्षणात अडथळा येऊ नये यासाठी प्रोत्साहन देणे. पात्रता • अर्जदाराने अमृत संस्थेच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषांची पूर्तता केलेली असावी. • खुल्या प्रवर्गातील अशा जातींमधील विद्यार्थी, ज्यांना इतर कोणत्याही शासकीय विभाग, संस्था किंवा महामंडळामार्फत समान लाभ मिळत नाही. • AIIMS, IIT, IIM, IIIT तसेच NID, ICT, IISc, IISER आणि IIFT या केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश घेतलेला असावा.
आवश्यक कागदपत्रे • संबंधित संस्थेचे प्रवेशपत्र (Admission Letter) • प्रवेश घेतल्याचा पुरावा • संस्थेचे ओळखपत्र (Identity Card) • बोनाफाईड प्रमाणपत्र • आधार संलग्न बँक खात्याचा तपशील • उत्पन्नाचा दाखला • प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या शेवटी उत्तीर्ण झालेल्या परीक्षेची गुणपत्रिका
लाभाचे स्वरूप • संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत प्रति विद्यार्थी प्रतिमहिना ₹१०,००० इतके प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य. • प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी ११ महिन्यांचे अर्थसहाय्य देण्यात येईल. • अर्थसहाय्याची रक्कम वर्षातून दोन हप्त्यांमध्ये (प्रत्येक सेमिस्टर उत्तीर्ण झाल्यानंतर) लाभार्थ्याच्या खात्यात जमा केली जाईल. • पुढील सेमिस्टरचे अर्थसहाय्य मिळविण्यासाठी मागील सेमिस्टरची गुणपत्रिका सादर करणे आवश्यक राहील.
अर्ज करण्याची पद्धत • अमृत संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा. • आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करावीत. • अर्जाची स्वाक्षरीत हार्डकॉपी व स्व-साक्षांकित कागदपत्रांसह अमृत कार्यालयात सादर करावी.
योजनेतील महत्त्वाचे बदल • AIIMS, IIT, IIM, IIIT व्यतिरिक्त NID, ICT, IISc, IISER आणि IIFT या राष्ट्रीय स्तरावरील संस्थांचा समावेश करण्यात आला आहे. • "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य" (First Come, First Served) या तत्त्वानुसार २०० लाभार्थ्यांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. • सदर योजनेसाठी ऑगस्ट २०२६ महिन्यात अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून, अर्ज सादर करण्याबाबतची सविस्तर माहिती लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
पत्ता : अमृत जिल्हा कार्यालय, प्रशासकीय भवन, तळमजला, जिल्हा अधिकारी कार्यालय परिसर, सिविल लाइन, वर्धा संपर्क : 9112227632
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment