ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी हिंगोलीतील युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

हिंगोली जिल्ह्यात अमृतच्या ड्रोन प्रशिक्षण उपक्रमाला युवक-युवतींकडून चांगला प्रतिसाद मिळत असून कौशल्य विकासातून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत,तरी जास्तीत जास्त युवकांनी या प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी  हिंगोलीतील युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन  मुख्य फोटो
मुख्य फोटो

हिंगोली जिल्ह्यात अमृतच्या ड्रोन पायलट प्रशिक्षण उपक्रमाला युवक-युवतींकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कौशल्य विकासाद्वारे रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य अमृतच्या माध्यमातून सातत्याने करण्यात येत आहे. जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी या संधीचा उपयोग करावा, असे आवाहन अमृत जिल्हा कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आह्व.

नुकतीच कळमनुरी येथील श्री. अविनाश देशपांडे यांनी अमृत जिल्हा कार्यालयास भेट देऊन ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी आवश्यक अर्ज व कागदपत्रे सादर केली. यावेळी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी करून प्रशिक्षणासाठी आवश्यक पात्रता, प्रवेश प्रक्रिया, अटी व शर्ती, प्रशिक्षणाचा कालावधी तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच ड्रोन प्रशिक्षणाशी संबंधित सर्व आवश्यक माहिती लाभार्थ्यांना समजावून सांगण्यात आली असून, प्रवेश प्रक्रियेतील पुढील टप्प्यांविषयीही सविस्तर माहिती देण्यात आली.

अधिक माहितीसाठी संपर्क- ७३९१०६५४७१

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/



Publisher: Shrikant Dhotre News publisher name | Date: 27-07-2026 News publication date | Time: 03:32 PM News publication time | Views: 21 Number of times this news has been viewed | District: Hingoli Related district of the news
Publisher: Shrikant Dhotre News publisher name | Date: 27-07-2026 News publication date | Time: 03:32 PM News publication time | Views: 21 Number of times this news has been viewed | District: Hingoli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement