अमृत संस्थेचे सर्व लाभार्थी, EDP, सूर्यमित्र व ड्रोन प्रशिक्षणार्थी, बचत गट, युवक-युवती तसेच नांदेड उत्तर मतदारसंघातील नागरिकांनी या विशेष प्रशासकीय मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत कार्यालय, नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नांदेड, दि. २५ जुलै : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त, उपविभागीय अधिकारी तथा तालुका दंडाधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या वतीने 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' अंतर्गत रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता ए.के. संभाजी मंगल कार्यालय, नांदेड येथे विशेष प्रशासकीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात अमृत उद्योग कौशल्यवर्धन (EDP), सूर्यमित्र व ड्रोन प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या शुभहस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच विविध शासकीय विभागांचे माहिती स्टॉल्स उभारण्यात येणार असून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, दाखले, अर्ज प्रक्रिया व प्रशासकीय सेवांबाबत नागरिकांना थेट मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय अमृत संस्थेच्या आगामी प्रशिक्षण कार्यक्रम, स्वयंरोजगाराच्या संधी व विविध उपक्रमांची माहितीही लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या सर्वांसाठी चहा व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी अमृत संस्थेचे सर्व लाभार्थी, EDP, सूर्यमित्र व ड्रोन प्रशिक्षणार्थी, बचत गट, युवक-युवती तसेच नांदेड उत्तर मतदारसंघातील नागरिकांनी या विशेष प्रशासकीय मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत कार्यालय, नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment