डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती, अकोला यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सर्व आधुनिक सुविधांनी युक्त 'स्वामी विवेकानंद अभ्यासिका' चे उद्घाटन २६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता बी. आर. हायस्कूल, अकोला येथे होणार आहे.
डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती, अकोला यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सर्व आधुनिक सुविधांनी युक्त 'स्वामी विवेकानंद अभ्यासिका' सुरू करण्यात येत असून, तिचा उद्घाटन समारंभ रविवार, दि.२६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता बी. आर. हायस्कूल, चिवचिव बाजार जवळ, अकोला येथे आयोजित करण्यात आला आहे. अकोला परिसरातील शालेय, महाविद्यालयीन तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शांत, शिस्तबद्ध व अभ्यासपूरक वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही अभ्यासिका सुरू करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी, गुणवत्तापूर्ण अभ्यासाची सवय लागावी आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी सक्षम वातावरण निर्माण व्हावे, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे. या उद्घाटन समारंभाला मा. श्री. दीपकजी तामशेटीवार (प्रांत संघचालक, विदर्भ प्रांत), मा. श्री. सुमंतजी आमशेकर (पश्चिम क्षेत्र प्रचारक), मा. श्री. चंद्रशेखरजी राठी (अध्यक्ष, डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती, अकोला) तसेच मा. श्री. नानासाहेब मोहरील (अध्यक्ष, अकोला अर्बन एज्युकेशन सोसायटी) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या प्रसंगी विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षणप्रेमी नागरिक तसेच अकोला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन प्रकल्प समिती, स्वामी विवेकानंद अभ्यासिका यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment