अमृतच्या कर्जव्याज परतावा योजनेचा लाभ; पिकअप वाहनाच्या माध्यमातून व्यवसायाला मिळाली नवी उभारी

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या कर्जव्याज परतावा योजनेचा लाभ घेत अमोल नारायण गोखले (रा. सौंदाळे, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) यांनी वाहन कर्जाद्वारे पिकअप वाहन खरेदी करून आपल्या व्यवसायाला नवी दिशा दिली आहे.

अमृतच्या कर्जव्याज परतावा योजनेचा लाभ; पिकअप वाहनाच्या माध्यमातून व्यवसायाला मिळाली नवी उभारी मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या कर्जव्याज परतावा योजनेचा लाभ घेत अमोल नारायण गोखले (रा. सौंदाळे, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) यांनी वाहन कर्जाद्वारे पिकअप वाहन खरेदी करून आपल्या व्यवसायाला नवी दिशा दिली आहे.

स्वयंरोजगाराला चालना देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या योजनेमुळे कर्जावरील व्याजाचा आर्थिक भार कमी झाला असून व्यवसाय अधिक सक्षमपणे पुढे नेणे शक्य झाले आहे. पिकअप वाहनाच्या माध्यमातून मालवाहतूक सेवा अधिक कार्यक्षम झाली असून उत्पन्नात वाढ होण्यास मदत होत आहे.

अमृतची कर्जव्याज परतावा योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील उद्योजकांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रभावी ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेक लाभार्थी स्वतःचा व्यवसाय उभा करत असून स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीलाही चालना मिळत आहे. या योजनेचा लाभ घेऊन व्यवसाय विस्ताराचे स्वप्न साकार करणाऱ्या अमोल नारायण गोखले यांनी अमृतच्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत इतर पात्र नागरिकांनीही या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Shriram Kelkar News publisher name | Date: 23-07-2026 News publication date | Time: 06:29 PM News publication time | Views: 44 Number of times this news has been viewed | District: Sindhudurg Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement