मेहनत, चिकाटी आणि जिद्दीचा विजय; अविराज देशपांडे यांचे NEET २०२६ मध्ये दैदिप्यमान यश

NEET २०२६ मध्ये अविराज देशपांडे यांची चमकदार कामगिरी; अमृत संस्थेतर्फे केले अभिनंदन

मेहनत, चिकाटी आणि जिद्दीचा विजय; अविराज देशपांडे यांचे NEET २०२६  मध्ये दैदिप्यमान यश मुख्य फोटो
मुख्य फोटो

मेहनत, चिकाटी आणि जिद्दीचा विजय; अविराज देशपांडे यांचे NEET २०२६ मध्ये दैदिप्यमान यश बारामती : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा NEET 2026 मध्ये बारामतीच्या अविराज देशपांडे यांनी उल्लेखनीय यश संपादन करत ७२० पैकी ६६० गुण, ऑल इंडिया रँक (AIR) ९०६ आणि कॅटेगरी रँक ५३५ मिळवत आपल्या मेहनतीची सुवर्णमोहोर उमटवली आहे. अविराज यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, अथक परिश्रम, वेळेचे योग्य नियोजन आणि अढळ आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळवले. मात्र, या यशामागे त्यांच्या आई-वडिलांचे त्याग, कष्ट, प्रोत्साहन आणि सततचे मार्गदर्शन यांचा मोलाचा वाटा आहे. मुलाच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी केलेले परिश्रम आज यशाच्या रूपाने फळाला आले आहेत. स्पर्धेच्या युगातही शांत, संयमी आणि नियोजनबद्ध अभ्यास करत अविराज यांनी देशपातळीवर उल्लेखनीय स्थान मिळवले. त्यांच्या या यशामुळे बारामतीच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढला असून, अनेक विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणादायी ठरले आहेत. अविराज देशपांडे यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अमृत संस्था तसेच सातारा जिल्हा उपव्यवस्थापक श्री. अविनाश कुलकर्णी यांनी अविराज आणि त्यांच्या पालकांची भेट घेऊन त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्याच्या पुढील उज्ज्वल वैद्यकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा व्यक्त दिल्या आहेत.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: अविनाश कुलकर्णी News publisher name | Date: 19-07-2026 News publication date | Time: 08:39 AM News publication time | Views: 96 Number of times this news has been viewed | District: Satara Related district of the news
Publisher: अविनाश कुलकर्णी News publisher name | Date: 19-07-2026 News publication date | Time: 08:39 AM News publication time | Views: 96 Number of times this news has been viewed | District: Satara Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement