दिसण्यापेक्षा गुणवत्ता महत्वाची

बोधकथा क्र.-५४

दिसण्यापेक्षा गुणवत्ता महत्वाची मुख्य फोटो
मुख्य फोटो

एकदा एक वृद्ध गाढव गवत चरण्यासाठी गेले. त्याला गवत चरण्यासाठी फार दूरवर जाणे शक्य होईना,म्हणून त्याने एक युक्ती केली. घराजवळील शेतात तो वाघाचे कातडे पांघरून जात असे. त्याला पाहून सारे जण दूर पळून जात. अशावेळी तो एकटा मजेत गवत चरत राही. एकदा असेच गवत चरत असताना रस्त्यावरील गाढव ओरडू लागले. हे पाहून वाघाचे कातडे पांघरलेले हे गाढवही ओरडू लागले. त्याचा असा आवाज ऐकताच शेतक-याला समजले की हा वाघ नसून गाढव आहे. शेतक-याने त्यास बेदम मारले.
या गोष्टीचा मतितार्थ एवढाच की, केवळ बाह्य रूपावर आपण काही काल आपले वर्चस्व दाखवू शकतो परंतु समाजातील आपले खरे स्थान आपल्या गुणवत्तेवर आधारीत असते. लोकमान्य टिळक,स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद यांनी सुद्धा निव्वळ बुद्धीमत्तेच्या जोरावर समाजात आपली एक वेगळी प्रतिमा उभी केली.आपण आपल्या अंतर्गत गुणांमुळे समाजात आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पाडू शकतो. केवळ सुंदर रूप किंवा अमाप श्रीमंती कधीच कामी येत नाही. ह्या दोन्ही गोष्टी नश्वर आहेत. चिरकाल टिकते ती आपली बुद्धीमत्ता.

संदर्भ- संस्कारांचे मोती

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 10-07-2026 News publication date | Time: 02:08 PM News publication time | Views: 61 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 10-07-2026 News publication date | Time: 02:08 PM News publication time | Views: 61 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement