अहिल्यानगरच्या समर्थ कुलकर्णी यांची फ्लाइंग ऑफिसर म्हणून निवड

उत्तुंग भरारी घेतलेल्या आपल्या विद्यार्थ्याचा शाळेतर्फे हृद्य सत्कार

अहिल्यानगरच्या समर्थ कुलकर्णी यांची फ्लाइंग ऑफिसर म्हणून निवड मुख्य फोटो
अहिल्यानगरच्या समर्थ कुलकर्णी यांची फ्लाइंग ऑफिसर म्हणून निवड अतिरिक्त फोटो

अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यातील समर्थ कुलकर्णी यांची भारतीय वायुसेनेत फ्लाइंग ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली. समर्थ कुलकर्णी हे जामखेडच्या नवीन मराठी प्राथमिक शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. शाळेने जामखेडमध्ये नुकताच त्यांचा सत्कार केला. समर्थ कुलकर्णी यांच्या या यशामुळे शिक्षकवृंद आणि जामखेडकर भारावून गेले. जामखेडकरांसाठी ही अभिमानास्पद बाब असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
सत्कार समारंभाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून संरक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेले फक्राबाद (जामखेड) येथील श्री गांगेय गोशाळेचे संचालक माणिक दत्तात्रेय देशपांडे उपस्थित होते. आपल्या शाळेच्या विद्यार्थ्याने घेतलेली ही गगनभरारी सर्वांसाठी आणि जामखेडसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. अमृत संस्थेतर्फे अहिल्यानगर जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून त्यांचे अभिनंदन केले.
.........
अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 24-12-2025 News publication date | Time: 09:27 PM News publication time | Views: 239 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 24-12-2025 News publication date | Time: 09:27 PM News publication time | Views: 239 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words