अमृत लघुउद्योजक उद्योजकता विकास (EDP) प्रशिक्षणासाठी ऑनलाइन अर्ज सुरू
अमरावती : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाच्या वतीने अमृतच्या लक्षित गटातील नागरिकांसाठी लघुउद्योजक उद्योजकता विकास (EDP) प्रशिक्षण या पूर्णतः मोफत प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणारे तसेच सुरू असलेल्या व्यवसायाचा विस्तार करू इच्छिणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी www.mahaamrut.org या पोर्टलवर जाऊन आपला ऑनलाइन अर्ज भरावा. या प्रशिक्षणामध्ये उद्योजकता विकास, व्यवसाय नियोजन, आर्थिक व्यवस्थापन, विपणन, शासकीय योजनांची माहिती तसेच व्यवसाय वाढीसाठी आवश्यक कौशल्यांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे.
ऑनलाइन अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे : - आधार कार्ड - पॅन कार्ड - वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (₹8 लाखांपर्यंत) - अधिवास (Domicile) प्रमाणपत्र - शाळा सोडल्याचा दाखला (TC) / जात नमूद असलेला दाखला - इयत्ता 10 वीची गुणपत्रिका - पासपोर्ट आकाराचे 2 फोटो - स्वघोषणापत्र (Self Declaration) - स्वाक्षरी अमृतच्या लक्षित गटातील सर्व पात्र नागरिकांनी या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपला व्यवसाय अधिक सक्षम, आधुनिक व यशस्वी बनवावा. उद्योजकतेच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन मिळविण्याची ही उत्तम संधी असून, सर्वांनी तात्काळ ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन अमृततर्फे करण्यात येत आहे. ऑनलाइन अर्जासाठी पोर्टल : www.mahaamrut.org अधिक माहितीसाठी संपर्क : अमृत जिल्हा कार्यालय, अमरावती आशीर्वाद बिल्डिंग, मालटेकडी, टोपे नगर समोर, अमरावती – 444601. संपर्क : 9112227673
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment