अमृत च्या EDP प्रशिक्षणातून घडला यशाचा मार्ग;

अमृतच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेतून आनंद शशिकांत ओक यांना ₹12,700 चा लाभ.

अमृत च्या EDP प्रशिक्षणातून घडला यशाचा मार्ग;  मुख्य फोटो
अमृत च्या EDP प्रशिक्षणातून घडला यशाचा मार्ग;  अतिरिक्त फोटो

अमरावती:-  महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या उद्योजकता विकास प्रशिक्षण (EDP) मध्ये सहभागी होत श्री. आनंद शशिकांत ओक यांनी व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक ज्ञान व कौशल्य आत्मसात केले. प्रशिक्षणामध्ये **व्यवसाय नियोजन, पॅकेजिंग, मार्केटिंग, ट्रेडिंग, अकाउंट मॅनेजमेंट, आर्थिक नियोजन व ग्राहक व्यवस्थापन यांसारख्या विषयांवर प्रात्यक्षिक (Practical) आणि सैद्धांतिक (Theory) स्वरूपात सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले.

  EDP प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून त्यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. व्यवसायासाठी कर्ज घेतल्यानंतर अमृतच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेचा लाभ घेत त्यांना पहिल्या टप्प्यात ₹ १२,७०० इतका कर्जावरील व्याज परतावा थेट प्राप्त झाला.

योग्य प्रशिक्षण, नियोजन आणि शासकीय योजनांचा प्रभावी वापर केल्यास व्यवसाय अधिक सक्षमपणे उभा करता येतो, याचे श्री. आनंद शशिकांत ओक हे प्रेरणादायी उदाहरण आहेत. अमृतच्या योजनांमुळे अनेक नवउद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यास, वाढविण्यास आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मोठी मदत होत आहे. प्रशिक्षणातून कौशल्य, कौशल्यातून उद्योग आणि उद्योगातून आर्थिक प्रगती" — हाच अमृतचा ध्यास. अधिक माहितीसाठी- अमृत जिल्हा कार्यालय, अमरावती, 9112227635

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: ऋषिकेश हरिश कथलकर News publisher name | Date: 29-06-2026 News publication date | Time: 03:56 PM News publication time | Views: 159 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: ऋषिकेश हरिश कथलकर News publisher name | Date: 29-06-2026 News publication date | Time: 03:56 PM News publication time | Views: 159 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement