आजच्या स्पर्धात्मक युगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य, आत्मविश्वास आणि अचूक मार्गदर्शन या शिबिराच्या माध्यमातून अत्यंत रंजक पद्धतीने (खेळांच्या माध्यमातून) दिले जाणार आहे.
अमृतवर्ग – गडहिंग्लज, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे अमृतवर्ग आयोजित करण्यात येणार आहे.
अमृतवर्गामध्ये मुलांमध्ये देशभक्ती, राष्ट्रप्रेम आणि चांगले संस्कार रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. विविध खेळ, प्रेरणादायी उपक्रम आणि आनंददायी कृतींमध्ये मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
मुलांनी उत्साहाने अमृतवर्गाचा आनंद लुटला आणि नव्या ऊर्जा व प्रेरणेसह घरी परतले.
"संस्कार, देशभक्ती आणि आनंदाचा संगम म्हणजे अमृतवर्ग!"
महाराष्ट्र संशोधन, उन्नती, प्रशिक्षण व प्रबोधिनी यांच्या मार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात खास 'अमृत निवासी अमृत मेळा' अंतर्गत अमृतवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. हा दोन दिवसीय वर्ग दिनांक ४ व ५ जुलै २०२६ रोजी गडहिंग्लज येथे आयोजित करण्यात आला आहे.
अमृतवर्गाची प्रमुख वैशिष्ट्ये:
अद्ययावत प्रशिक्षण: व्यक्तिमत्त्व विकासावर विशेष भर.
हे निवासी शिबिर केवळ दोन दिवसांचा वर्ग नसून तुमच्या भविष्याची आणि आयुष्याची नवी दिशा ठरवणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य, आत्मविश्वास आणि अचूक मार्गदर्शन या शिबिराच्या माध्यमातून अत्यंत रंजक पद्धतीने (खेळांच्या माध्यमातून) दिले जाणार आहे.
विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करावे. आपल्या प्रगतीचा मार्ग सुकर करण्यासाठी आणि आयुष्याला एक नवी उंची देण्यासाठी या शिबिराचा सर्वांनी जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अमृत संस्थेविषयी: महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावेत.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment