मेहनत आणि सातत्य यांच्या जोरावर अहिल्यानगरमधील वेदश्री महेश कुलकर्णीने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत वाणिज्य शाखेमध्ये राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.
अहिल्यानगरमधील रेसिडेन्शिअल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेत वेदश्री महेश कुलकर्णी हिने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत वाणिज्य शाखेमध्ये ९६.३३ टक्के गुण मिळवत राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. या अभिमानास्पद कामगिरीबद्दल अहिल्यानगर अमृत कार्यालयात तिचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आला. यावेळी अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी सर यांच्या शुभेच्छांचे अभिनंदन पत्र तिला देण्यात आले.
जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी वेदश्रीने घेतलेले परिश्रम, जिद्द आणि धडपड यांसारख्या गुणवैशिट्यांबद्दल तिचे कौतुक करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यापुढील शैक्षणिक प्रवासात अमृत संस्था तिला नेहमी सहकार्य करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी अमृत मित्र वैभव कुलकर्णी, अमृत सखी गौरी कुलकर्णी व अनिल बल्लाळ आदी उपस्थित होते.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी,जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक : 9112228769 जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment