कारंजेकरांचा अमृतपेठला उत्स्फूर्त प्रतिसाद

कारंजा येथे अमृत संस्थेद्वारे आयोजित एकदिवसीय अमृत पेठ उपक्रमास स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कारंजेकरांचा अमृतपेठला उत्स्फूर्त प्रतिसाद मुख्य फोटो
कारंजेकरांचा अमृतपेठला उत्स्फूर्त प्रतिसाद अतिरिक्त फोटो

10 जून 2026 कारंजा (लाड), प्रतिनिधी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय ‘अमृतपेठ’ उपक्रमास कारंजा शहर व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्थानिक उद्योजक, महिला बचत गट, गृहउद्योग करणारे उत्पादक आणि व्यापाऱ्यांनी मांडलेल्या विविध उत्पादनांच्या स्टॉलवर दिवसभर ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

या उपक्रमाचे उद्घाटन अभय रामराव पारसकर (श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदिर समितीचे विश्वस्त) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अभय खेडकर, निलेश घुडे व डॉ. विवेक घुडे( सामाजिक कार्यकर्ते) , प्रवीण कोळेश्वर (नागपूर विभाग व्यवस्थापक, अमृत) तसेच धनंजय कुलकर्णी (अमृत विभाग उपव्यवस्थापक) आणि योगेश जोशी (जिल्हा व्यवस्थापक, वाशिम) उपस्थित होते.

स्थानिक स्तरावर तयार होणाऱ्या गुणवत्तापूर्ण उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, ग्रामीण व लघुउद्योजकांना प्रोत्साहन देणे तसेच स्वावलंबी उद्योजकतेला चालना देणे या उद्देशाने अमृतच्या माध्यमातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू, घरगुती उपयोगाच्या वस्तू, पारंपरिक उत्पादने तसेच विविध गृहउद्योगांतून निर्मित वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या होत्या.

कारंजेकरांनी स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देत मोठ्या प्रमाणात खरेदी केली. त्यामुळे सहभागी उद्योजकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. अनेक उद्योजकांनी या उपक्रमामुळे त्यांच्या उत्पादनांची विक्री वाढल्याचे सांगत अमृतच्या या प्रयत्नांचे कौतुक केले.

‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेला बळकटी देणारा हा उपक्रम ठरला असून स्थानिक उत्पादनांना व्यापक ओळख मिळवून देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

अमृतच्या या उपक्रमामुळे स्थानिक उद्योजक, महिला बचत गट आणि गृहउद्योग करणाऱ्या व्यक्तींना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक योगेश जोशी, रोहित देशमुख (जिल्हा उपव्यवस्थापक) व नंदकिशोर वनस्कर यांनी विशेष परिश्रम घेतले.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Yogesh Joshi News publisher name | Date: 11-06-2026 News publication date | Time: 07:58 AM News publication time | Views: 49 Number of times this news has been viewed | District: Washim Related district of the news
Publisher: Yogesh Joshi News publisher name | Date: 11-06-2026 News publication date | Time: 07:58 AM News publication time | Views: 49 Number of times this news has been viewed | District: Washim Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement