ब्राह्मण संघातर्फे झालेल्या गुणवंत विद्यार्थी कौतुक व सत्कार सोहळ्यात अमृत तर्फे ड्रोन पायलट प्रशिक्षण पूर्ण केलेल्या राघव कुलकर्णी यांना कौतुकाची थाप

युवा ब्राह्मण संघ, यवतमाळ यांच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी कौतुक व सत्कार सोहळा रविवार, दि. ३१ मे २०२६ रोजी सायंकाळी श्रीराम मंदिर, तिवारी चौक, यवतमाळ येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात अमृत ड्रोन पायलट प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या राघव कुलकर्णी यांचाही गौरव करण्यात आला.

 ब्राह्मण संघातर्फे झालेल्या  गुणवंत विद्यार्थी कौतुक व सत्कार सोहळ्यात अमृत तर्फे ड्रोन पायलट प्रशिक्षण पूर्ण केलेल्या  राघव कुलकर्णी यांना  कौतुकाची थाप  मुख्य फोटो
 ब्राह्मण संघातर्फे झालेल्या  गुणवंत विद्यार्थी कौतुक व सत्कार सोहळ्यात अमृत तर्फे ड्रोन पायलट प्रशिक्षण पूर्ण केलेल्या  राघव कुलकर्णी यांना  कौतुकाची थाप  अतिरिक्त फोटो

या सत्कार सोहळ्यात दहावी व बारावीच्या परीक्षेत ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच पदवी व पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. याशिवाय विविध क्रीडा, कला, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच जिल्हास्तरीय, विभागीय व इतर स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून प्रमाणपत्रे, विशेष पुरस्कार व सन्मान प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

याच कार्यक्रमात अमृत तर्फे ड्रोन पायलट प्रशिक्षणाचा लाभ घेऊन यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या श्री. राघव कुलकर्णी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ग्रामीण युवकांसाठी उपलब्ध असलेल्या कौशल्य विकासाच्या संधींचा लाभ घेऊन त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डॉ. उदयजी नवलेकर (आबासाहेब पारवेकर महाविद्यालय, यवतमाळ) यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक युगात सातत्य, परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, यवतमाळचे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा. अरविंदजी देशपांडे हे होते.


कार्यक्रमादरम्यान अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. परीक्षित शर्मा यांनी अमृतची सविस्तर माहिती उपस्थितांसमोर मांडली. अमृतच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, कौशल्य विकास, रोजगाराभिमुख तसेच समाजोन्नतीच्या योजनांची माहिती देत अधिकाधिक युवक-युवतींनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.


कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, समाजबांधव तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.


अधिक माहितीसाठी संपर्क :


परीक्षित कमलकिशोर शर्मा


जिल्हा व्यवस्थापक


९११२२२७६३३


जिल्हा कार्यालय पत्ता :


स्वामी समर्थ विहार, पहिला माळा,


फ्लॅट क्रमांक ए-१,


अवधूतवाडी, तिवारी चौक,


यवतमाळ - ४४५ ००१


ई-मेल : amrut.yavatmal.dm@gmail.com

Publisher: Parikshit Sharma News publisher name | Date: 01-06-2026 News publication date | Time: 02:30 PM News publication time | Views: 137 Number of times this news has been viewed | District: Yavatmal Related district of the news
Publisher: Parikshit Sharma News publisher name | Date: 01-06-2026 News publication date | Time: 02:30 PM News publication time | Views: 137 Number of times this news has been viewed | District: Yavatmal Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement