महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे आणि इंडो जर्मन टूल रूम (IGTR), औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या प्रवर्गातील लक्षित गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवक-युवतींसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत दहावी, आयटीआय, डिप्लोमा व पदवीधर विद्यार्थ्यांना CNC Technology, CAD/CAM Design, AutoCAD, SolidWorks, CATIA, PLC Programming, Robotics & Automation, Mechatronics इत्यादी उद्योगाभिमुख प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणासोबत निवास व भोजनाची सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
प्रशिक्षणाचे प्रमुख फायदे
✔️ पूर्णपणे मोफत प्रशिक्षण
✔️ मोफत निवास व भोजन सुविधा
✔️ उद्योगमान्य अभ्यासक्रम
✔️ रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी
✔️ आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण
✔️ अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन
महत्त्वाच्या तारखा
📌 अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख : २० जून २०२६
📌 प्रवेश परीक्षा, कागदपत्र पडताळणी व मुलाखत : २२ जून २०२६
📌 प्रशिक्षण प्रारंभ : २४ जून २०२६
अर्ज प्रक्रिया
इच्छुक उमेदवारांनी Mahaamrut.org.in या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा.
पात्र युवक-युवतींनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपल्या उज्ज्वल करिअरची वाटचाल सुरू करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:-
अमृत अकोला जिल्हा कार्यालय
9112227636
अमृत अमरावती जिल्हा कार्यालय
9112227635
अमृत वाशिम जिल्हा कार्यालय
9112227634
अमृत यवतमाळ जिल्हा कार्यालय
9112227633
अमृत बुलढाणा जिल्हा कार्यालय
9112227637
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment