गडचिरोलीतील लाभार्थ्याचे मनोगत
माझे नाव साहिल प्रकाश मोहितकर अस आहे. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या जीसीसी-टीबीसी योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आणि माझ्या व्यक्तिमत्त्वात, तसेच कौशल्यात सकारात्मक बदल झाला. या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळाल्यामुळे फायदा झाला. तसेच मी काही महिने आधी महाराष्ट्र अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्वपरीक्षा ही स्पर्धा परीक्षाही उत्तीर्ण झालो असून, त्याचाही लाभ मला मिळणार आहे.
या लाभाबद्दल अमृत संस्थेचे गडचिरोली कार्यालय, तसेच जिल्हा व्यवस्थापक गौरव दुपल्लीवार आणि अन्य पदाधिकारी यांचे आभार मानतो. त्यांच्यामुळे मला ही संधी उपलब्ध झाली. पुढील काळातही संस्थेतर्फे असेच प्रशिक्षण कार्यक्रम आणि योजना लक्ष्यित गटासाठी आयोजित केल्या जाव्यात, अशी माझी अपेक्षाआहे. धन्यवाद!
- साहिल प्र. मोहितकर, गडचिरोली
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment