पुण्यातील गरजू ब्राह्मण विद्यार्थ्यांना अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ करणार मदत

भगवान परशुराम शैक्षणिक स्कॉलरशिप योजना जाहीर

पुण्यातील गरजू ब्राह्मण विद्यार्थ्यांना अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ करणार मदत मुख्य फोटो
मुख्य फोटो

पुणे : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पुणे जिल्हा विभागातर्फे गरीब व गरजू ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी भगवान परशुराम शैक्षणिक स्कॉलरशिप योजना (२०२६) जाहीर करण्यात आली आहे. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणात अडथळे येणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत इयत्ता आठवीपासून पुढे पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची, तसेच पालकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन पात्र विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असून, खरोखर गरज असलेल्या हुशार विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रे मागविण्यात येणार असून, आर्थिक परिस्थितीची पडताळणी करण्याचा अधिकार आयोजन समितीकडे राहणार आहे. तसेच विद्यार्थी मागील शैक्षणिक वर्षात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

स्कॉलरशिपची रक्कम २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी निश्चित करण्यात येणार असून, निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या किंवा शाळेच्या बँक खात्यावर धनादेश अथवा बँक ट्रान्स्फरद्वारे मदत वितरित केली जाईल. पुणे जिल्ह्यातील ब्राह्मण विद्यार्थ्यांना या योजनेत प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

'शिक्षण हाच उज्ज्वल भविष्याकडे जाण्याचा खरा मार्ग' असा संदेश देऊन विद्यार्थ्यांना आर्थिक आधार देऊन त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. 'एक पाऊल तुमचे, एक साथ आमची' या घोषवाक्यासह समाजातील दानशूर व्यक्तींनीदेखील या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्क : 9822520034 

वेबसाइट :www.brahmanmahasangh.org

Publisher: Siddhesh Keskar News publisher name | Date: 27-05-2026 News publication date | Time: 06:05 PM News publication time | Views: 508 Number of times this news has been viewed | District: Pune Related district of the news
Publisher: Siddhesh Keskar News publisher name | Date: 27-05-2026 News publication date | Time: 06:05 PM News publication time | Views: 508 Number of times this news has been viewed | District: Pune Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement