लघुउद्योजकांना व्यासपीठ आणि ग्राहकांना थेट उत्पादकांकडून खरेदीची संधी
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे ‘अमृतपेठ – थेट बाजारपेठ’ या विशेष प्रदर्शनाचे आयोजन छत्रपती संभाजीनगर शहरात करण्यात आले आहे. २४ ते २६ एप्रिल या काळात हे प्रदर्शन भरणार आहे. स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असून, राज्यातील विविध शहरांमध्ये या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता तो छत्रपती संभाजीनगरात आयोजित करण्यात आला आहे. अमृत संस्थेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे, उपव्यवस्थापक योगेश रोडे यांनी ही माहिती दिली.
या प्रदर्शनात विशेषतः महिला उद्योजकांना प्राधान्य देण्यात आले असून, नागरिकांना विविध स्वदेशी व घरगुती उत्पादने थेट उत्पादकांकडून खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. प्रदर्शनात विविध खाद्यपदार्थ, दैनंदिन वापराच्या वस्तू, कपडे, आयुर्वेदिक उत्पादने, तसेच हस्तकलेच्या वस्तूंचा समावेश असणार आहे. स्थानिक उद्योगांना चालना देण्यासाठी नागरिकांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन अमृत संस्थेने केले आहे.
अमृतपेठ थेट बाजारपेठ
दिनांक : २४ ते २६ एप्रिल २०२६
स्थळ : विघ्नहर्ता गणपती मंदिर हॉल, प्लॉट क्र. २३३-बी,
एन-३ सिडको, विघ्नहर्ता चॅरिटेबल ट्रस्ट,
छत्रपती कॉलेजजवळ, छत्रपती संभाजीनगर
अधिक माहितीसाठी संपर्क :
अमृत संस्थेचे विभागीय व जिल्हा कार्यालय,
पुंडलिक नगर रोड, सेक्टर-४ सिडको,
हनुमाननगर, पाण्याच्या टाकीजवळ,
छत्रपती संभाजीनगर - ४३१००९
मोबाइल : 9404593726, 7709080073
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment