गडचिरोलीत आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांनी जाणून घेतली आनंदाची सूत्रे

तुळजाभवानी प्राथमिक शाळेत आयोजन

गडचिरोलीत आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांनी जाणून घेतली आनंदाची सूत्रे मुख्य फोटो
गडचिरोलीत आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांनी जाणून घेतली आनंदाची सूत्रे अतिरिक्त फोटो

गडचिरोली : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे युवा कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आनंद मेळावा हा उपक्रम राबवण्यात आला. गडचिरोलीतील तुळजाभवानी प्राथमिक शाळेत हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यामध्ये सहभाग घेतला होता.

या कार्यक्रमात बौद्धिक खेळ, बोधकथा, सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तिपर गीते आणि सहभोजन इत्यादी उपक्रमांचा समावेश होता. विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेची भीती दूर व्हावी, त्यांना शाळेमधील शिक्षणाची गोडी लागावी, त्यांच्यावर सुसंस्कार व्हावेत, देशभक्ती, मैत्री आणि माणुसकी हे गुण त्यांच्या अंगी यावेत, या उद्देशाने त्यांना मनोरंजनाच्या माध्यमातून शिक्षण देणे हा आनंद मेळाव्याचा उद्देश होता. 

अमृत संस्थेचे गडचिरोली जिल्हा व्यवस्थापक गौरव दुप्पल्लीवार, अमृतसखी सौ. माधुरी रोडकर, तुळजाभवानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कुंदा टिकले आणि सर्व शिक्षकांनी या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी कष्ट घेतले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/



Publisher: Gaurav Dupalliwar News publisher name | Date: 22-04-2026 News publication date | Time: 10:23 AM News publication time | Views: 645 Number of times this news has been viewed | District: Gadchiroli Related district of the news
Publisher: Gaurav Dupalliwar News publisher name | Date: 22-04-2026 News publication date | Time: 10:23 AM News publication time | Views: 645 Number of times this news has been viewed | District: Gadchiroli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement