विविध मान्यवरांची उपस्थिती
जळगाव : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या जळगाव जिल्हा कार्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३५व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 'आरपीआय'चे नेते, नवनिर्वाचित नगरसेवक, राज्य रेशन दुकानदार मालक चालक संघटनेचे अध्यक्ष अनिलभाऊ अडकमोल या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील नागरिकांना रेशन कार्डविषयी ज्या काही अडीअडचणी असतील, त्या सोडवण्यासाठी आपण सर्वतोपरी साह्य करू, अशी ग्वाही अडकमोल यांनी अध्यक्षीय भाषणात दिली.
समरसता साहित्य परिषदेचे देवगिरी प्रांत कार्यकारिणी सदस्य सुरेश कुलकर्णी, शहर संघचालक उज्ज्वल चौधरी, समरसता गतिविधि जळगाव जिल्हा समिती सदस्य विजयराव मोघे, जैन इरिगेशन सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेडचे पीआरओ विजयराव मोहरीर, जोशी बंधू ज्वेलर्सचे अशोकराव जोशी, विश्व हिंदू परिषदेचे सोमनाथ महाजन, गोल्ड जिम ट्रेनर अक्षय सोनार यांच्यासह लक्ष्यित समाजाच्या सौ. चौधरी/सोनार, जिल्हा प्रचार मंडळ सदस्य प्रदीप कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि समारोप अमृत संस्थेचे जळगाव जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र कानडे यांनी केले. त्यांनी अमृत संस्थेच्या सर्व योजनांची तपशीलवार माहिती पाहुण्यांना दिली. अमृतमित्र प्रद्योत कुलकर्णी, विनोद देशपांडे यांनी या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment